Mansukh Hiren Case : तू अटक हो! दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो; सचिन वाजेंबाबत मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब

By पूनम अपराज | Published: March 9, 2021 04:06 PM2021-03-09T16:06:08+5:302021-03-09T16:08:26+5:30

Mansukh Hiren's wife's statement about Sachin vaze : विमला यांनी सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे Sachin Waje यांनी आपल्या पतीला मुकेश अंबानी Mukesh Ambani प्रकरणात अटक हो, दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो असं सांगितलं असल्याची जबाबात स्पष्ट केले आहे. 

You Get Arrest! In two or three days I will get you out on bail; Mansukh Hiren's wife's statement about Sachin Vaze | Mansukh Hiren Case : तू अटक हो! दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो; सचिन वाजेंबाबत मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब

Mansukh Hiren Case : तू अटक हो! दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो; सचिन वाजेंबाबत मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब

Next
ठळक मुद्देवेळी हिरेन यांना सांगितले, तुम्ही अटक होण्याचो काही गरज नाही. आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी हिरेन थोडे टेन्शनमध्ये असल्याचे वाटत होते. 

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन Mansukh Hiren यांचा मुंब्रा रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह सापडल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस चौकशी करत होते. मात्र चौकशीदरम्यान मनसुख यांचा मृतदेह सापडल्याने गृहमंत्र्यांनी याबाबत तपास मुंबई पोलिसांकडे न देता एटीएसकडे दिला. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने ७ मार्चला रीतसर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विमला यांनी एटीएसने दिलेल्या आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विमला यांनी सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे Sachin vaze यांनी आपल्या पतीला मुकेश अंबानीप्रकरणात अटक हो, दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो असं सांगितलं असल्याची जबाबात स्पष्ट केले आहे. 

 


एटीएसने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यानुसार ७ मार्चला  भा दं वि कलम 302, 201, 34,120 - B  प्रमाणे हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांचे फिर्यादीवरून एटीएसने गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार हिरेन यांच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या असून त्याचा मृतदेह १० - १२ तास पाण्यात होता असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे. विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ३ मार्च रोजी हिरेन माझे पती सकाळी नेहमीप्रमाणे दुकानावर गेले आणि रात्री दुकान बंद करून ९ वाजता घरी परत आले. त्यावेळी रात्री मला माझे पती यांनी सांगितले की, सचिन वाजे बोलत आहे की, तू या केसमध्ये अटक हो, दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो, मी त्यावेळी हिरेन यांना सांगितले, तुम्ही अटक होण्याचो काही गरज नाही. आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी हिरेन थोडे टेन्शनमध्ये असल्याचे वाटत होते. 

 

पीपीई किटमधला चालक अन् मनसुख हिरेन यांनी शेवटच्या क्षणी बदललेलं लोकेशन; गूढ वाढलं

 

४ मार्चला माझे पती हिरेन यांनी सकाळी माझ्या मोबाईलवरून माझे दीर विनोद  यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल, तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकीलांशी माझा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणी करून ठेव असे सांगून ते दुकानात निघून गेले होते, असे विमला यांनी आपल्या जबाबात एटीएसला माहिती दिली आहे. यावरून मनसुख यांना अटक होण्यासाठी वाजे दबाब तर टाकत नव्हते ना ? आणि अटक होणार या विचाराने मनसुख तणावाखाली होते का ? असे प्रश्न निर्माण होतात. तसेच अटकेपूर्वी मनसुख यांनी आपल्या भावाच्या पत्नीला अटकपूर्व जामिनासाठी चांगल्या वकीलांशी बोलून ठेव अशी पूर्व कल्पना दिली होती. म्हणजेच मनसुख यांना आपल्याला अटक होण्याची शक्यता होती. 

Web Title: You Get Arrest! In two or three days I will get you out on bail; Mansukh Hiren's wife's statement about Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.