गर्लफ्रेंड बनून महिला पोलिसाने आवळल्या कुख्यात गुंडाच्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 03:20 PM2019-10-16T15:20:58+5:302019-10-16T15:21:29+5:30

महिला पोलिसाने गर्लफ्रेंड बनून कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्याची घटना समोर आली आहे.

Women Police office Caught robber after Chatting | गर्लफ्रेंड बनून महिला पोलिसाने आवळल्या कुख्यात गुंडाच्या मुसक्या 

गर्लफ्रेंड बनून महिला पोलिसाने आवळल्या कुख्यात गुंडाच्या मुसक्या 

Next

नवी दिल्ली - प्रेमाच्या जाळ्यात ओढून बड्या व्यक्तींना, व्यापाऱ्यांना फसवल्याच्या अनेक घटनांबाबत तुम्ही ऐकल्या असतील. पण दिल्ली पोलिसांनी चक्क गुन्हेगारांकडून वापरण्यात येणार हाच फंडा वापरून एका कुख्यात गुंडाला बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलीस दलात सेवेत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने एका सराईत गुंडाला सुरुवातीला आपल्या गोड बोलण्यामध्ये गुंतवले. त्यानंतर त्याच्याशी त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाने  चॅटिंग सुरू केली. मग वेशांतर करून त्याला भेटण्यासाठी बोलावले. अखेरीस जेव्हा हा गुंड तिला भेटण्यास आला तेव्हा मुंडका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच या गुंडाने दिलेल्या माहितीवरून त्याच्या अजून दोन साथीदारांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. 

   याबाबत डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, ''गुरुवारी मुंडका पोलीस ठाण्याच्या हद्दील एक कॅब लुटण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा सोमवीर नावाच्या एका आरोपीच्या कथित प्रेयसीची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून मोबाईल घेत तो आपल्या एका महिला कॉन्स्टेबलकडे दिला. त्यानंतर तिने सोमवीरसोबत चॅटिंग सुरू केली.''

''ती त्याला भेटण्यासाठी खूप उत्सूक असल्याची जाणीव तिने सोमवीरला करून दिली. तिच्यावर विश्वास बसल्यानंतर सोमवीरने भेटण्यासाठी वेळ आणि ठिकाण निश्चित केले. दरम्यान, पोलिस तिथे सापळा लावून दबा धरून बसले. त्यानंतर सोमवीर तिथे आला असता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतल्यानंतर प्रदीप आणि मनोज यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  

Web Title: Women Police office Caught robber after Chatting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.