पोलीस ठाण्यात महिला पोलिसाने शूट केला टिक - टॉक व्हिडीओ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 05:55 PM2019-07-25T17:55:36+5:302019-07-25T17:57:56+5:30

तिला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.  

Women police had shoot Tik Tok video at police station and ... | पोलीस ठाण्यात महिला पोलिसाने शूट केला टिक - टॉक व्हिडीओ अन्...

पोलीस ठाण्यात महिला पोलिसाने शूट केला टिक - टॉक व्हिडीओ अन्...

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात कार्यरत असणारी महिला पोलीस अर्पिता चौधरी हिनं कामावर असताना टिक - टॉक व्हिडीओ शूट केला. तो सोशल मीडियावर शेअर करणं गुजरातमधील महिला पोलिसाला महागात पडलं आहे.

गुजरात  - पोलीस ठाण्यात  टिक - टॉक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करणं गुजरातमधील महिला पोलिसाला महागात पडलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.  

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारी महिला पोलीस अर्पिता चौधरी हिनं कामावर असताना टिक - टॉक व्हिडीओ शूट केला. पोलीस ठाण्यात असलेल्या तुरुंगाच्या समोरच ती बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे. हा  व्हिडीओ २० जुलै रोजी पोलीस ठाण्यात सिव्हिल ड्रेसमध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपसह अन्य सोशल मीडिया साईटवर तो व्हायरल झाला.

Web Title: Women police had shoot Tik Tok video at police station and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.