women death in Tempo accident | टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

पिंपरी : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. चिखली येथे सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया अजमेर अली अन्सारी (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शकील महंमद ईकू अन्सारी (वय २७) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मयत आशिया यांचे पती अजमेर यारमहंमद अन्सारी (वय ३०, रा. मोशी रोड, चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक संतोष मधुकर खडके (वय २९, रा. वस्तापूर, ता. अचलपूर, जि. अमरावती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात किरकोळ जखमी झालेला शकील अन्सारी फियार्दी अजमेर अन्सारी यांच्या आत्याचा मुलगा आहे. फिर्यादी अजमेर यांची पत्नी आशिया आणि शकील दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपी संतोष खडके याच्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने आशिया अन्सारी दुचाकीवरून खाली पडून अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. शकील किरकोळ जखमी झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: women death in Tempo accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.