नागपुरात ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:25 AM2020-01-21T00:25:59+5:302020-01-21T00:27:15+5:30

लुनावरून जात असताना भरधाव ट्रकचालकाने धडक मारल्याने लुनावर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला.

Woman killed, husband injured in truck accident in Nagpur | नागपुरात ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती जखमी

नागपुरात ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती जखमी

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : लुनावरून जात असताना भरधाव ट्रकचालकाने धडक मारल्याने लुनावर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला.
नवीननगर पारडी येथील रहिवासी भगवती फुलसिंग वर्मा (वय ४०) आणि त्यांची पत्नी रेखा लुनावर बसून जात होते. भरतनगर चौक, सरजा बारसमोर अज्ञात ट्रकच्या चालकाने वर्मा दाम्पत्याच्या लुनाला जोरदार धडक मारली. त्यामुळे रेखा वर्मा ठार झाल्या तर त्यांचे पती भगवती वर्मा जबर जखमी झाले. कळमना पोलिसांनी जखमी वर्मा यांचे बयान नोंदवून घेतल्यानंतर दोषी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

जखमी सायकलस्वाराचा मृत्यू
लकडगंजच्या गरोबा मैदानात राहणारे रवींद्र मनोहर येनपेंड्डीवार (वय ५३) यांचा अपघाती मृत्यू झाला. १५ जानेवारीला रात्री १०.३० च्या सुमारास ते जखमी अवस्थेत कापसी चौकाजवळ पडून दिसले होते. बाजूलाच त्यांची सायकल होती. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास मृत घोषित केले. लकडगंज पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Woman killed, husband injured in truck accident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.