'तो मला मारत होता, वैतागली होती त्याला', पत्नी आणि प्रियकराने मिळून केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:37 AM2022-05-16T11:37:17+5:302022-05-16T11:37:38+5:30

Delhi Crime News : एका न्यूज एजन्सीनुसार, अर्जुन घोषचा मृतदेह त्याचा घरात बेडवर आढळून आला होता. मृत व्यक्तीच्या गळ्यावर निशाण होते.

Woman and her lover held for allegedly killing husband in Delhi | 'तो मला मारत होता, वैतागली होती त्याला', पत्नी आणि प्रियकराने मिळून केली पतीची हत्या

'तो मला मारत होता, वैतागली होती त्याला', पत्नी आणि प्रियकराने मिळून केली पतीची हत्या

Next

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi Crime News) पोलिसांनी एक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांवरही हत्येचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, ३२ वर्षीय स्वर्नाली घोष आणि ३५ वर्षीय मोहनपाल उर्फ शांतनुने मिळून अर्जुन घोषची हत्या केली. ही घटना कालकाजी भागातील आहे.

एका न्यूज एजन्सीनुसार, अर्जुन घोषचा मृतदेह त्याचा घरात बेडवर आढळून आला होता. मृत व्यक्तीच्या गळ्यावर निशाण होते. ज्यावरून हे स्पष्ट होतं की, त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी जेव्हा प्रकरणाची सुरू केली तेव्हा मृतकाच्या पत्नीवर संशय आला. जेव्हा तिची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. 

आरोपी पत्नी स्वर्नालीने सांगितलं की, तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती अर्जुनची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच महिलेच्या प्रियकराचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस एशा पांण्डेयने सांगितलं की, आरोपी मोहनलाल पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पळून जाण्याच्या तयारी होता. मात्र, पोलिसांना त्याला पकडलं.

पोलिसांनी चौकशी केली तेव्हा आरोपी स्वर्नालीने सांगितलं की, तिचा पती अर्जुन तिला मारहाण करत होता. ती त्याच्या या वागण्याला वैतागली होती. तेव्हा दोन वर्षाआधी तिची भेट मोहनलालसोबत झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि अफेअर सुरू झालं. स्वर्नालीने पुढे सांगितलं की, तिला मोहनलालसोबतच रहायचं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून अर्जुनला मारण्याचा प्लान केला. दोघांनी मिळून अर्जुनची हत्या केली. नंतर मोहनलालने हत्येत वापरलेला चाकू आणि रक्ताचे कपडे एका नाल्यात फेकले.
 

Web Title: Woman and her lover held for allegedly killing husband in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.