पत्नीचा विष पिऊन मृत्यू तर पतीची फेसबुक लाईव्ह करून रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 12:51 PM2020-11-17T12:51:14+5:302020-11-17T13:01:32+5:30

Jalgaon Crime News : विष प्राशनाने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने असोदा रेल्वे गेटजवळ येऊन घटनेबाबत फेसबुक लाईव्ह केले, त्यानंतर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.२० वाजता घडली.

Wife dies of poisoning while husband commits suicide under train by making Facebook live | पत्नीचा विष पिऊन मृत्यू तर पतीची फेसबुक लाईव्ह करून रेल्वेखाली आत्महत्या

पत्नीचा विष पिऊन मृत्यू तर पतीची फेसबुक लाईव्ह करून रेल्वेखाली आत्महत्या

Next

जळगाव : विष प्राशनाने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने असोदा रेल्वे गेटजवळ येऊन घटनेबाबत फेसबुक लाईव्ह केले, त्यानंतर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.२० वाजता घडली. कांचन प्रमोद शेटे (२८) असे पत्नीचे तर प्रमोद तुकाराम शेटे (३२) रा.कांचन नगर असे पतीचे नाव आहे. दरम्यान, कांचन हिची आत्महत्या आहे की हत्या हे अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र तिच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद व कांचन हे कांचन नगरात दोन मुलींसह वास्तव्याला होते. पत्नी-पत्नीत नेहमीच खटके उडत होते. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला. त्यात कांचन हिने विषप्राशन केले तर प्रमोद याने तसाच घरातून काढता पाय घेत असोदा रेल्वेगेट गाठले. तेथे फेसबुक लाईव्ह करुन खांब क्र.४२२/२ ते ४२२/४  दरम्यान भुसावळकडून येणाऱ्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. यात प्रमोद याच्या शरीराचे दोन तुकडे झाले असून रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे पडले होते. मुंडके असलेले धड व कमरेपासून पाय असलेले धड किमान पाच फुटाच्या अंतरावर होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनी पेठ पोलीस स्टेशनचे हवालदार मनोज इंद्रेकर, किरण वानखेडे व होमगार्ड विजय पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेहाचे दोन्ही तुकडे जिल्हा रुग्णालयात आणले. दुसरीकडे कांचन हिला नातेवाईकांनी देवकर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनीही रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली.

मित्राला ऑडिओ मेसेज केला अन‌् घटना उघड झाली
घटनेच्या आधी प्रमोद याने सकाळी ७ वाजता सोबत काम करणाऱ्या मित्राला ऑडीओ मेसेज केला. काही वेळाने मित्राने हा मेसेज ऐकून प्रमोद याच्या नातेवाईकांचे घर गाठले. तेथून प्रमोदची सासू सुरेखा राजेंद्र वाणी, शालक जयेश व मेहुणी प्रियंका यांनी प्रमोदचे घर गाठले असता कांचन मृतावस्थेत होती तर त्यांची दोन्ही लहान मुले गिरीशा व हिरन ही दोघंही झोपलेली होती. कांचनला मृत पाहून आई, भाऊ व बहिणीने हंबरडा फोडताच झोपलेली दोन्ही मुले जागे झाली. त्यानंतर प्रमोदचे आजोबा देविदास शेटे व आजी कमलाबाई यांनी घराकडे धाव घेतली.

रेल्वे रुळानजीक मद्य प्राशन केले
प्रमोद याने सकाळीच घर सोडून रेल्वे रुळ गाठले. तेथे एका खोलीजवळ मद्य प्राशन केले. शेवटचा मद्याचा ग्लास भरुन ठेवल्यानंतर त्याने ८.५७ वाजता फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर भुसावळकडून येणाऱ्या रेल्वेखाली झोकून दिले. रेल्वे रुळानजीकच्या खोलीजवळ प्रमोद याने भरलेला दारुचा ग्लास व कोल्ड्रींक्सची बाटली, तसेच रिकामी झालेली दारुची बाटली तेथे आढळून आली. गल्लीतील तरुणांनी ही बाटली पोलिसांना दाखविली.

काय आहे फेसबुक लाईव्हमधील संवाद
सर्वात आधी माझ्या आईला नमस्कार, त्यानंतर माझ्या वडीलांना नमस्कार.. कारण त्यांनी मला जन्म दिला आहे. आणि दुसरा नमस्कार माझे जन्म दिलानंतर ही सुध्दा ज्यांनी माझा सांभाळ केला ते माझे आजी-बाबा (मा आणि आप्पा) यांना नमस्कार... ज्यानी माझा जीवनभर साथ निभावण्याची शपथ घेतली होती, ते आज मरण पावल्यामुळे दोन मिनिटे बोलत आहे, आणि माझा शेवटचा गुड बाय करीत आहे. याच्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही, चेहरा तर मी दाखवूच शकत नाही तुम्हाला. कारण माझी वाईफच या दुनियेत राहिली नाही.आपल्याला पण रहायला इंट्रेस नाही आता...ज्यांना मराठी कळत नसेल त्यांना  सो  स्वॉरी, कारण की मी जन्मापासूनच मराठी आहे.

 

Read in English

Web Title: Wife dies of poisoning while husband commits suicide under train by making Facebook live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.