गुप्तांगात रॉड खुपसून नराधमांनी विधवा महिलेवर केला गँगरेप

By पूनम अपराज | Published: January 10, 2021 09:06 PM2021-01-10T21:06:12+5:302021-01-10T21:07:04+5:30

Gangrape : नुकसान भरपाईची मागणी केल्यामुळे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला, असे या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

A widow was gang-raped by three man with a rod inserted in her private part in jharkhand | गुप्तांगात रॉड खुपसून नराधमांनी विधवा महिलेवर केला गँगरेप

गुप्तांगात रॉड खुपसून नराधमांनी विधवा महिलेवर केला गँगरेप

Next
ठळक मुद्दे३ आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास चत्राच्या हंटरगंज भागात ही घटना घडली.

झारखंडच्या चत्रामध्ये तीन जणांनी एका ५० अवर्षीय विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ५० वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने बकरीला मारहाण केल्याबद्दल एका आरोपीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. नुकसान भरपाईची मागणी केल्यामुळे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला, असे या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना एसपी रिषभ झा म्हणाले की, या महिलेचा जबाब नोंदविण्यात आला आहे आणि दोषी आढळलेल्यांना सोडले जाणार नाही. झारखंडच्या चत्रामध्ये तीन जणांनी ५० वर्षाच्या विधवेवर सामूहिक बलात्कार केला आणि पीडितेच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड खुपसण्यात आला होता. ३ आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास चत्राच्या हंटरगंज भागात ही घटना घडली. ३ पुरुषांनी तिचे अपहरण केले गेले. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला, तिच्या खासगी भागात स्टीलचा रॉड खुपसला आणि घटनेबद्दल तिने कुणाशी वाच्यता केली त्याचे परिणाम वाईट होतील असे धमकावून त्यांनी तेथून पळ काढला. तिच्या कुटुंबातील सदस्याला ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. महिलेला हंटरगंज कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथून तिला बिहारच्या गया येथील अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. आता पीडित महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

 

नुकतेच उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील उघाईटी भागात रविवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर एका महिलेच्या हत्या करण्यात आली. ही अमानुष घटना ताजी असताना तामिळनाडूत देखील धक्कादायक घटना घडली होती. तामिळनाडूतील नागापट्टीणम येथे एका मंदिरात आलेल्या ४० वर्षीय विधवा महिलेला मारहाण करून तिच्यावर गँगरेप केल्याची कथित धक्कादायक घटना घडली आहे. आता झारखंडमध्ये या गॅंगरेपच्या घटनेने खळबळ माजली आहे. 

Web Title: A widow was gang-raped by three man with a rod inserted in her private part in jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.