विधवा महिलेवर गावातल्याच चौघांनी केला गँगरेप, आरोपी सुटले होते जामिनावर

By पूनम अपराज | Published: December 14, 2020 07:49 PM2020-12-14T19:49:21+5:302020-12-14T19:51:09+5:30

Gangrape : काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप या पीडित महिलेने या आरोपींवर केला होता.

The widow was gang-raped by four people in the village, The accused was released on bail | विधवा महिलेवर गावातल्याच चौघांनी केला गँगरेप, आरोपी सुटले होते जामिनावर

विधवा महिलेवर गावातल्याच चौघांनी केला गँगरेप, आरोपी सुटले होते जामिनावर

Next
ठळक मुद्दे१० डिसेंबर रोजी गावातलेच चार जण विधवा महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातसामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. दुबौलिया परिसरात चार जणांनी एका घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप या पीडित महिलेने या आरोपींवर केला होता. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

१० डिसेंबर रोजी गावातलेच चार जण विधवा महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी दिली, असे देखील पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोपींवर पीडित महिलेने आणखी एक आरोप केला आहे. तिच्या पतीची हत्या करून मृतदेह गायब केल्याची तक्रार तिने याआधीही या आरोपींविरोधात दाखल केली होती. त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपींची नंतर जामिनावर सुटका झाली.

Web Title: The widow was gang-raped by four people in the village, The accused was released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.