मिटवायचे का नाही? जावयाने शिक्षक सासऱ्याच्या डोक्यात घातला बाकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:42 AM2021-11-24T10:42:49+5:302021-11-24T10:44:30+5:30

शुभम सुनील कदम, स्वप्निल भारत जाधव, रणजीत रामदास जाधव व किरण जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. करमाळा शहरातील दत्त पेठ येथील एका दुकानासमोर रविवारी रात्री हा प्रकार झाला आहे

Why not delete? son in law put a buck on the teacher's father-in-law's head | मिटवायचे का नाही? जावयाने शिक्षक सासऱ्याच्या डोक्यात घातला बाकडा

मिटवायचे का नाही? जावयाने शिक्षक सासऱ्याच्या डोक्यात घातला बाकडा

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला आषाढ महिना आहे, असे म्हणून घरी आणून सोडले होते, असे फिर्यादीत म्हटले आहेत.

सोलापूर - मिटवायचे नाही का? असे म्हणत जावयाने शिक्षक असलेल्या सासऱ्या मारहाण करताना जवळच असलेला लाकडी बाकडा डोक्यात घातला. तुला व तुझ्या घरच्यांना भोसकून जीव मारतो, अशी धमकीही दिला. याप्रकरणी जावयासह चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

शुभम सुनील कदम, स्वप्निल भारत जाधव, रणजीत रामदास जाधव व किरण जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. करमाळा शहरातील दत्त पेठ येथील एका दुकानासमोर रविवारी रात्री हा प्रकार झाला आहे. शिक्षकाच्या मेव्हण्याने का त्रास देता, विचारले, तेव्हा ‘आम्हाला तुमची कंपनी द्या, आम्ही तुम्हाला तुमच्या हिस्साचे पैसे देतो,’ असे जावयाने सांगितले होते. मुलीला त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी कंपनीमधील हिस्सा त्यांना देऊन टाकला, तसेच त्या कंपनीच्या जागेचे पैसे देण्याचे ठरले असताना, त्यांनी ते पैसे दिले नाहीत. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला आषाढ महिना आहे, असे म्हणून घरी आणून सोडले होते, असे फिर्यादीत म्हटले आहेत.

रविवारी सांयकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे फिर्यादी मित्रास भेटण्यासाठी दत्त पेठ येथे गेले, तेव्हा शुभम व स्वप्निल तेथे गेले. ‘तुला तुझ्या मुलीचे व कंपनीचे मिटवायचे नाही का?’ असे म्हणाले. तेव्हा फिर्यादीने, ‘तुमच्याकडील दोन व आमच्याकडील दोन लोक बोलावून बसून चर्चा करू,’ असे सांगितले, तेव्हा ‘मुलीला घेऊन जाणार नाही,’ असे म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर, तेथे रणजीत व किरण आले. त्यांनीही मारहाण केली. त्यांनी समोरच्या दुकानाचे बाकडे उचलून डोक्यात मारून जखमी केले.
 

Web Title: Why not delete? son in law put a buck on the teacher's father-in-law's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.