उसने पैसे परत का देत नाही? असं विचारणाऱ्या तरुणाची तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 10:24 AM2021-08-02T10:24:06+5:302021-08-02T10:24:26+5:30

विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होते. आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते.

Why doesn't he return the money? A young man who asked such a question was stabbed to death in pune | उसने पैसे परत का देत नाही? असं विचारणाऱ्या तरुणाची तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या

उसने पैसे परत का देत नाही? असं विचारणाऱ्या तरुणाची तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या

Next

पुणे : मित्राचे हात उसने घेतलेले पैसे परत का करत नाही, असे विचारायला गेलेल्या मध्यस्थ तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन करण्यात आला. हा प्रकार मांजरी खुर्द येथील स्मशानभूमीजवळ आरोपींच्या घरासमोर रविवारी रात्री ११ वाजता घडला. 

विकास लक्ष्मण सोनवणे (वय ३१, रा. मांजरी खुर्द) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होते. आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. आरोपी हे पैसे परत करत नसल्याने रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला होता. हे समजल्यावर विकास रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या घरी गेला. त्यांना पैसे परत का करत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींबरोबर वाद झाला. त्यातून पाच जणांनी विकासवर वार करुन त्याचा खुन केला. लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Why doesn't he return the money? A young man who asked such a question was stabbed to death in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस