While trying to flee the country, Dawood ibrahim's nephew was arrested on airport | देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दाऊदच्या पुतण्याला अटक
देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दाऊदच्या पुतण्याला अटक

मुंबई : कुख्यात अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला दोन साथीदारांसह खंडणीखोरी प्रकरणी मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. 
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान असे त्याचे नाव असून मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. रिझवान देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असताना खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली. 

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अहमद रझा वधारिया याला अटक केली होती. दाऊदच्या टोळीचा खंडणीखोर फहीम मचमच याचा तो जवळचा साथीदार आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वधारियाच्या चौकशीमध्ये रिझवानचे नाव पुढे आले होते. यानुसार मिळालेल्या माहितीवर गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर सापळा लावला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रिझवानला भारताबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली.  


Web Title: While trying to flee the country, Dawood ibrahim's nephew was arrested on airport
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.