Aryan Khan: आर्यन खानवरील NCB कारवाईला नवीन वळण; वसुलीचा प्लॅन आधीच ठरला होता, मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 05:26 PM2021-11-10T17:26:39+5:302021-11-10T17:27:14+5:30

NCB Raid on Mumbai Cruise Rave Party: २ आणि ३ ऑक्टोबरचा हा चॅट आहे. त्यात प्रभाकर साईलला किरण गोसावीने मेसेज पाठवले होते.

WhatsApp chat between kiran gosavi, prabhakar sail exposes extortion deal in Aryan khan drug case | Aryan Khan: आर्यन खानवरील NCB कारवाईला नवीन वळण; वसुलीचा प्लॅन आधीच ठरला होता, मोठा खुलासा

Aryan Khan: आर्यन खानवरील NCB कारवाईला नवीन वळण; वसुलीचा प्लॅन आधीच ठरला होता, मोठा खुलासा

googlenewsNext

मुंबई – आर्यन खान ड्रग्स प्रकरणात(Aryan Khan Drugs Case) एक नवीन खुलासा झाला आहे. क्रुझवरील छापेमारी आर्यन खानला अटक केल्यानंतर अभिनेता शाहरुख खानकडून(Shahrukh Khan) वसुली करण्याचा प्लॅन तयार होता याचे पुरावे समोर आले आहेत. किरण गोसावीने बॉडीगार्ड प्रभाकर साईलच्या माध्यमातून हा प्रकार केला. क्रुझवर पार्टीत कोण कोण येणार याची किरण गोसावीला आधीच कल्पना होती. त्याची गोसावीने प्रभाकर साईलला पाठवली होती. त्यानंतर आर्यन खानच्या कुटुंबाकडून वसुलीचा प्लॅन रचला गेला. २५ कोटींची डील झाली ती १८ कोटींमध्ये फायनल करण्यात आली. हे सगळं किरण गोसावी(Kiran Gosavi) आणि प्रभाकर साईल यांच्या व्हॉट्सअप चॅटमधून उघड झालं आहे.

२ आणि ३ ऑक्टोबरचा हा चॅट आहे. त्यात प्रभाकर साईलला किरण गोसावीने मेसेज पाठवले होते. हे चॅट पाहिल्यानंतर किरण गोसावी आणि त्याच्या सहकाऱ्याने NCB च्या नावाखाली वसुली करण्याचं डाव आखला होता हे स्पष्ट होते. मागील २ दिवसांपासून NCB ची एसआयटी टीम प्रभाकर साईलची चौकशी करत आहे. प्रभाकर साईलने हे पुरावे NCB समोर मांडले. चॅटमधून जे समोर आले आहे ते प्रतिज्ञापत्रातही प्रभाकर साईलनं मांडलं आहे. टीव्ही ९ हिंदीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

२ ऑक्टोबरला आर्यन खानसह इतरांना क्रुझवरील ड्रग्स पार्टीत NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी छापेमारी करुन अटक केली होती. प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की, NCB छापेमारीपूर्वी गोसावीकडे १० लोकांची लिस्ट होती. त्यांना अटक करण्यासाठी सापळा रचला होता. गोसावी आणि प्रभाकरचं हे चॅट २ ऑक्टोबर दुपारी १ वाजून २३ मिनिटांचं आहे. किरण गोसावीने प्रभाकर साईलला व्हॉट्सअपवर काही लोकांचे फोटो पाठवले आणि हे लोक जर क्रुझवर ग्रीन गेटमधून जाताना दिसले तर सांग अशी सूचना दिली होती. लोकांची ओळख पटवण्यासाठी गोसावीने प्रभाकरचा फोटो पाठवले होते हे व्हॉट्सअपमधून सिद्ध होते.

काय आहे चॅटमध्ये?

 गोसावी – कोणासमोर ओपन करू नको, सामान्य माणसाप्रमाणे वाग

प्रभाकर – यस सर,

गोसावी – आली का? काय घातले?

प्रभाकर – शॉर्ट ड्रेस आहे पिंक

गोसावी – फोटो पाठवून ही आहे का?

प्रभाकर – वाईट टी शर्ट, फुल दाढी आहे तो

व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की, गोसावीने त्याच्या जवळील यादीतील लोकांची ओळख पटवून घेण्यासाठी प्रभाकरची मदत घेत होता. त्यानंतर गोसावीने छापेमारीनंतर प्रभाकरला मेसेज केला भेटला तो, आतापर्यंत १२ पकडले आहेत. प्रभाकर – फोटो पाठवत हाच होता ना? प्रभाकरच्या प्रतिज्ञापत्रानुसार ४ वाजून २३ मिनिटांनी गोसावीने त्याला NCB ने १३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

तारीख ३ ऑक्टोबर

आतापर्यंत क्रुझवरील लोकांना पकडलं होतं. गोसावीने आता वसुलीचा खेळ सुरु केला. क्रुझ पार्टीवर छापेमारी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हॉट्सअप चॅट आहे. प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्यात बोलणं झालं होतं. या चॅटमध्ये प्रभाकर साईलला मेसेज करुन हाजी अलीला जा, जे काम सांगितलंय ते पूर्ण करुन ये असं किरणने म्हटलं होतं.

गोसावी – Go to Hajiali Complete work which I told, come back to home

प्रभाकर – Yes Sir

गोसावी – lock the door and throw key inside hall from window

प्रभाकर – Yes

गोसावी – Go Fast and Come Fast

प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रानुसार, गोसावीने हाजीअलीच्या इंडियाना हॉटेलजवळ जाऊन कुणाकडून ५० लाख घ्यायला सांगितले. प्रभाकर सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी तिथं पोहचला. ज्याठिकाणी एक सफेद रंगाची कार आली होती. त्यांनी २ बॅग भरुन पैसे प्रभाकरला दिले. हे दोन्ही व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलं आहे. त्यामुळे क्रुझवरील पार्टीत कोण कोण येणार आहे आणि कुणाकडून कशी वसुली करायची हे आधीच प्लॅनिंग ठरवलं होतं हे उघड झालं आहे.

Web Title: WhatsApp chat between kiran gosavi, prabhakar sail exposes extortion deal in Aryan khan drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.