सुशातनं आत्महत्येपूर्वी गुगलवर काय सर्च केले होते? मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:48 PM2020-08-03T18:48:57+5:302020-08-03T19:12:02+5:30

बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया याबद्दलही सर्च केलं होतं” अशी माहिती परमवीर सिंग यांनी पत्रकारांना दिली.

What did Sushant Singh Rajput searched on Google before committing suicide? Mumbai Police made a big revelation | सुशातनं आत्महत्येपूर्वी गुगलवर काय सर्च केले होते? मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा

सुशातनं आत्महत्येपूर्वी गुगलवर काय सर्च केले होते? मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा

Next
ठळक मुद्दे सुशांतच्या बिल्डिंगचे 13 अणि 14 जूनचे सीसीटीव्ही फूटेजची देखील पोलिसांनी तपासणी केली. मुंबई पोलीस, वांद्रे पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. आर्थिक, आरोग्यविषयी तसेच इतर सर्व बाजूने तपास सुरु आहे, असे परमवीर सिंग यांनी सांगितले.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर ‘पेनलेस डेथ’ याविषयी सर्च केलं होतं, अशी खळबळजनक माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. सुशांतने गुगलवर ‘पेनलेस डेथ’ याविषयी सर्च केलं. बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया याबद्दलही सर्च केलं होतं” अशी माहिती परमवीर सिंग यांनी पत्रकारांना दिली.

सुशांतच्या बिल्डिंगचे 13 अणि 14 जूनचे सीसीटीव्ही फूटेजची देखील पोलिसांनी तपासणी केली. पार्टीबाबत कोणतेच ठोस पुरावे आढळले नाही. त्यामुळे सुशांतने आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री म्हणजेच 13 जूनला कुठलीच पार्टी केली नव्हती, हे प्राथमिक तपासात दिसत आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. मुंबई पोलीस, वांद्रे पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. आर्थिक, आरोग्यविषयी तसेच इतर सर्व बाजूने तपास सुरु आहे, असे परमवीर सिंग यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी 16 जूनला सुशांतच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवले आहेत. त्यावर त्यांचे हस्ताक्षरही आहे. चौकशी काळात सुशांतच्या वडील, बहीण, मेहुणा यांचे जबाब घेतले गेले आहेत. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नव्हता. वडिलांनी नंतर बिहारमध्ये तक्रार दाखल केली, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. एखाद्या राज्यात घटना घडली असेल तर त्याचा तपास त्याच राज्याचे पोलीस करतात. याबाबत आम्ही अधिक कायदेशीर माहिती घेत आहोत. पाटणा पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल करून गुन्हा मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करायला हवा होता, असेही परमवीर सिंह म्हणाले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

 

 

Web Title: What did Sushant Singh Rajput searched on Google before committing suicide? Mumbai Police made a big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.