व्यापम घोटाळा : ३० दोषी आरोपींना ७ वर्ष तर एकाला १० वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:51 PM2019-11-25T16:51:03+5:302019-11-25T17:02:24+5:30

न्यायालयाने केला निकाल जाहीर

Vyapam Scam: 1 convicted for 10 years imprisonment and 30 for 7 years imprisonment | व्यापम घोटाळा : ३० दोषी आरोपींना ७ वर्ष तर एकाला १० वर्षांचा कारावास

व्यापम घोटाळा : ३० दोषी आरोपींना ७ वर्ष तर एकाला १० वर्षांचा कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देया घोटाळ्याचा सूत्रधार प्रदीप त्यागीला १० वर्षांचा कारावास तर उर्वरित ३० आरोपींना ७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.२०१३ मध्ये या घोटाळ्याला वाचा फुटली. २०१३ मधील व्यापम पोलीस भरती प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व 31 आरोपींना २१ नोव्हेंबरला दोषी ठरवले.

मध्य प्रदेश  - २०१३ मधील व्यापम पोलीस भरती प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व 31 आरोपींना २१ नोव्हेंबरला दोषी ठरवले. आज याप्रकरणी या दोषी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयने ३१ आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते असून सर्व आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर होते त्यांना २१ नोव्हेंबरला निकालानंतर कोठडीत पाठविण्यात आले. न्यायालयाने आज ३१ जणांना शिक्षा सुनावली असून या घोटाळ्याचा सूत्रधार प्रदीप त्यागीला १० वर्षांचा कारावास तर उर्वरित ३० आरोपींना ७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

हे आहेत ३१ दोषी आरोपी
अनिल यादव राहणार - प्रयागराज (उत्तर प्रदेश), अजय सिकरवार राहणार - मुरैना, धर्मेश सिंह राहणार - आग्रा (उत्तर प्रदेश), फूलकुंवर सिंह राहणार - मुरादाबाद (उत्तर प्रदेश), देवेंद्र यादव राहणार - झांसी (उत्तर प्रदेश), अजीत चौधरी राहणार - मथुरा (उत्तर प्रदेश), भूपेंद्र सिंह राहणार - मुरैना, सतीश शर्मा राहणार - मुरैना, चंद्रपाल कश्यप राहणार - फरुखाबाद (उत्तर प्रदेश), राहुल पांडे राहणार - वाराणसी (उत्तर प्रदेश), आशी कुमार पांडे राहणार - मिर्जापुर (उत्तर प्रदेश), कुलविजय वर्मा राहणार - बाराबंकी (उत्तर प्रदेश), मुकेश सिंह गुर्जर राहणार - ग्वालियर, अस्र्ण गुर्जर राहणार - ग्वालियर, उदयभान सिंह राहणार - ग्वालियर, दिनेश धाकड़ राहणार - मुरैना, अतेंद्र सिंह राहणार - भिंड, परवेंद्र सिंह राहणार - मुरैना, सुदीप शर्मा राहणार - भिंड, अजय प्रताप सिंह राहणार - मुरैना, कलियान सिंह राहणार - मुरैना, गुलवीर सिंह राहणार - मथुरा (उत्तर प्रदेश), राजवीर सिंह राहणार - मुरैना आणि निवास जाटव राहणार - मुरैना, अभिषेक कटियार राहणार - फस्र्खाबाद (उत्तर प्रदेश), सुयश सक्सेना राहणार - काशीराम नगर (उत्तर प्रदेश), प्रभाकर शर्मा राहणार - मुरैना, प्रदीप त्यागी राहणार- मुरैना, नीरज मिश्रा राहणार - प्रयागराज (उत्तर प्रदेश),पंजाब सिंह जाटव राहणार - मुरैना, शिवशंकर राहणार - मिर्जापुर (उत्तर प्रदेश)

काय आहे व्यापम घोटाळा?
मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठ्या नेत्यांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली. २००९ मध्ये या घोटाळ्याला सुरुवात झाली होती. २०१३ मध्ये या घोटाळ्याला वाचा फुटली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत होते.
 

 

Web Title: Vyapam Scam: 1 convicted for 10 years imprisonment and 30 for 7 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.