उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पोलीस अधिकारी एका वृद्ध महिलेशी गैरवर्तन करताना दिसत आहे. "म्हातारे, माझं ऐक... मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू स्वत:चा चेहराही विसरून जाशील. मी तुझ्या बापाची नोकर नाही" असं म्हटलं आहे.
वृद्ध महिलेला त्रास देणारी पोलीस अधिकारी उन्नाव सदर पोलीस ठाण्यात तैनात असून उमा अग्रवाल असं तिचं नाव आहे. बंदूहार गावातील रहिवासी रिंकीने तिचा पती अमित कुमार, सासू छेदाना देवी, सासरे प्रेम, दीर विशाल आणि नणंद पूनम यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता, हे सर्वजण डकौलीमध्ये राहतात.
२८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी उमा अग्रवाल रिंकीसोबत डकौली गावात आली. येथे रिंकीची ६० वर्षांची सासू छेदाना देवीशी वाद झाला. याच वेळी "मी तुझ्या बापाची नोकर नाही" असं वृद्ध महिलेला म्हणाली. छेदाना देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी वारंवार तिला त्रास देत होती. तिला कागदपत्रावर सही करण्यास सांगितलं. तिने नकार दिल्यावर पोलीस अधिकारी संतापली.
"मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू स्वत:चा चेहराही विसरून जाशील" असंही म्हटलं आहे. कोतवाली पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा उमा अग्रवाल आल्या तेव्हा लोक संतापले आणि ओरडू लागले. त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. परिस्थिती चिघळताना पाहून उमाने हस्तक्षेप केला आणि परिस्थिती शांत केली. पोलिसांचं म्हणणं आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना दाखवली नाही. फक्त एक छोटासा भाग दाखवण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
Web Summary : A video shows an Unnao policewoman, Uma Agarwal, verbally abusing an elderly woman, threatening violence. Agarwal is accused of mistreating the woman during a dowry harassment case investigation. The police claim the video is a partial representation of events.
Web Summary : उन्नाव में एक महिला पुलिस अधिकारी, उमा अग्रवाल, का एक वीडियो वायरल हो रहा है, जिसमें वह एक वृद्ध महिला को धमका रही हैं। अग्रवाल पर दहेज उत्पीड़न मामले की जांच के दौरान महिला के साथ दुर्व्यवहार करने का आरोप है। पुलिस का दावा है कि वीडियो घटनाओं का आंशिक प्रतिनिधित्व है।