डॉक्टरच्या वाहनाची चार युवकांकडून तोडफोड; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:24 PM2021-05-14T20:24:16+5:302021-05-14T20:25:01+5:30

Attack on Doctor's car : यात वाहनाच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.

Vandalism of a doctor's vehicle by four youths; Anger at not admitting the patient | डॉक्टरच्या वाहनाची चार युवकांकडून तोडफोड; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप

डॉक्टरच्या वाहनाची चार युवकांकडून तोडफोड; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप

Next
ठळक मुद्दे शहरातील मालगुजारीपुरा परिसरात राहणारा आसिफ नामक युवक चार दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकाला डॉ. सचिन तोटे यांच्या श्री हॉस्पीटलमध्ये उपचाराकरिता घेऊन गेला होता.

वर्धा: चार दिवसांपूर्वी रुग्णाला दाखल करुन न घेतल्याचा राग मनात धरुन चौघांनी खासगी डॉक्टरच्या वाहनाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास बॅचलर रोडवरील श्री हॉस्पीटलसमोर घडली.


शहरातील मालगुजारीपुरा परिसरात राहणारा आसिफ नामक युवक चार दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकाला डॉ. सचिन तोटे यांच्या श्री हॉस्पीटलमध्ये उपचाराकरिता घेऊन गेला होता. रुग्ण मृतावस्थेत असल्याने डॉक्टरांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला. हाच राग मनात धरुन आसिफ आपल्या तीन सहकाºयांसोबत शुक्रवारी रात्री श्री हॉस्पीटलपासून काही अंतरावर दबा धरुन बसला होता. यादरम्यान डॉ. तोटे यांचे चारचाकी वाहन हॉस्पीटलसमोर उभे दिसताच चौघांनीही वाहनासह परिसरातील घरांवर दगडफे क केली.

यात वाहनाच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक आपल्या कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चारही युवक तेथून पसार झाले होते. डॉ. सचिन तोटे यांच्यावर गुरुवारी रात्री सुद्धा एका व्यक्तीने हल्ला केला. परंतु रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि एका व्यक्तीने त्याला पिटाळून लावल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. घटनेनंतर डॉ. सचिन तोटे हे रामनगर पोलिसात तक्रार देण्याकरिता गेले. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

Web Title: Vandalism of a doctor's vehicle by four youths; Anger at not admitting the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.