भयंकर! वर्गात दंगा करण्यापासून शिक्षकानं अडवलं; रागाच्या भरात विद्यार्थ्यानं भर रस्त्यात मारली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 02:33 PM2021-03-07T14:33:28+5:302021-03-07T14:49:20+5:30

Crime News : ही घटना शनिवारी घडली असून या घटनेआधी मुरादनगर परिसरातील एका शाळेत सचिन त्यांगी नावाचे गृहस्थ बारावीच्या वर्गात शिकवत होते. 

Uttar pradesh student fired on school teacher when stopped from creating ruckus | भयंकर! वर्गात दंगा करण्यापासून शिक्षकानं अडवलं; रागाच्या भरात विद्यार्थ्यानं भर रस्त्यात मारली गोळी

भयंकर! वर्गात दंगा करण्यापासून शिक्षकानं अडवलं; रागाच्या भरात विद्यार्थ्यानं भर रस्त्यात मारली गोळी

Next

उत्तरप्रदेशातील गाझियाबादमधील मुरादनगर परिसरात गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विद्यार्थ्यानं शिक्षकाला गोळी मारल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यानं भर रस्त्यात शिक्षकाला गोळी मारली आहे. ही घटना शनिवारी घडली असून या घटनेआधी मुरादनगर परिसरातील एका शाळेत सचिन त्यांगी नावाचे गृहस्थ बारावीच्या वर्गात शिकवत होते. 

हिरेन यांचा मृत्यू बुडूनच, अंगावर किरकोळ खरचटल्याच्या खुणा

सचिन यांनी वर्गात दंगा करण्यापासून रोखल्यामुळे एका विद्यार्थ्यानं सुडबुद्धीनं शिक्षकाला मारण्याचा विचार केला त्यासाठी भर रस्त्यात गोळी मारण्याचे विकृत कृत्य या मुलानं केलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतील शिक्षकाकडून ओरडा खाल्ल्यानंतर हा विद्यार्थी डोकेदुखीचं कारण देत वर्गाच्या बाहेर पडला आणि आपल्या तीन साथीदारांसह रस्त्यात शिक्षिकेची वाट पाहत होता. 

Mansukh Hiren: चेहऱ्यासह डोळ्याजवळही छोट्या जखमा; मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणी गूढ आणखी वाढलं!

हा विद्यार्थी बाईकनं घरी जात होता तेव्हा शिक्षक दिसताच त्यानं गाडी थांबवली आणि त्यांच्यावर गोळी चालवून फरार झाला. ही गोळी सचिन त्यागी  यांना चाटून गेली. पीडित शिक्षिकानं या घटनेबाबत पोलिस स्थानकात जाऊन तक्रार नोंदवली असून ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारावर आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळजनक वातावरण तयार झालं आहे.

Web Title: Uttar pradesh student fired on school teacher when stopped from creating ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.