दोन मुलांच्या वडिलांना कोर्टाने सुनावली तब्बल २१२ वर्षांची शिक्षा, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 09:46 AM2021-03-15T09:46:08+5:302021-03-15T09:49:01+5:30

डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपीने ३ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे २२ कोटी रूपयांचा विमा मिळवण्यासाठी आपल्या दोन मुलांची हत्या केली होती.

US court sentenced father to 212 years in prison for killing two sons to collect life insurance claim | दोन मुलांच्या वडिलांना कोर्टाने सुनावली तब्बल २१२ वर्षांची शिक्षा, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

दोन मुलांच्या वडिलांना कोर्टाने सुनावली तब्बल २१२ वर्षांची शिक्षा, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

Next

अमेरिकेतील लॉज एंजेलिसमधील एका कोर्टाने एका व्यक्तीला २१२ वर्षांची शिक्षा (Father Sentenced To 212 Years In Prison)  सुनावली आहे. ही आतापर्यंत एखाद्या आरोपीला देण्यात आलेली सर्वात जास्त दिवसांची शिक्षा आहे. या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने त्याच्या १३ वर्षाच्या आणि ८ वर्षाच्या दोन लेकरांची निर्दयीपणे हत्या केली होती. 

डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपीने ३ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे २२ कोटी रूपयांचा विमा मिळवण्यासाठी आपल्या दोन मुलांची हत्या केली होती. त्याने ही हत्या अपघात दाखवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो यात यशस्वी होऊ शकला नाही आणि तो पकडला गेला. आरोपीचं नाव एल्मेजायन आहे आणि तो इजिप्तचा नागरीक आहे. (हे पण वाचा : घरात नैसर्गिक विधी केल्याच्या रागात दाेन वर्षीय चिमुरडीची हत्या; सावत्र वडिलांना अटक)

२०१५ साली आरोपीने मुद्दामहून त्याची कार लॉस एंजेलिस पोर्टजवळ पाण्यात बुडवली होती. यादरम्यान त्याच्यासोबत त्याची घटस्फोटीत पत्नी आणि दोन मुले होती. गाडी पाण्यात बुडत असताना तो स्वीमिंग करत बाहेर आला. पण पत्नी आणि मुलांना तिथेच सोडलं. दोन्ही मुले कारच्या सीटच्या मधे फसले होते. असं असलं तरी मच्छिमारांनी त्याच्या पत्नीला वाचवलं होतं.

मुलांच्या मृत्यूनंतर मिळाले होते पैसे

आरोपीला मुलांच्या मृत्यूनंतर एक्सीडेंटल डेथ इन्शुरन्स क्लेमच्या रूपात कंपनीकडून २६०,००० अमेरिकी डॉललर म्हणजे १ कोटी ८८ लाख रूपये मिळाले होते. या पैशातून त्याने इजिप्तमध्ये एक बोट आणि जमीन खरेदी केली.  (हे पण वाचा : विकृतीचा कळस, अल्पवयीनाला समोर उभा करून पत्नीशी ठेवायचा शारीरिक संबंध)

दरम्यान २१२ वर्षांची शिक्षा सुनावताना डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश जॉन वॉल्टर म्हणाले की, आरोपी अली अल्मेजायन एका लालची आणि निर्दयी मारेकरी आहे. ते पुढे म्हणाले की आरोपीने लाइफ इन्शुरन्सची रक्कम मिळवण्यासाठी अनेकदा खोटं बोललं आहे. आपल्या निष्पाप मुलांवरही त्याला दया आली नाही.

कोर्टाने २१२ वर्षाची शिक्षा सुनावण्यासोबतच आरोपी अली अल्मेजायनला इन्शुरन्स कंपनीचे २६१,७५१ अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास १ कोटी ९० लाख रूपये परत करण्याचा आदेश दिला आहे. 
 

Web Title: US court sentenced father to 212 years in prison for killing two sons to collect life insurance claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.