आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 03:39 PM2020-08-08T15:39:30+5:302020-08-08T15:44:26+5:30

न्यायालयात हजर जरून पुन्हा कारागृहात नेण्याऐवजी आरोपींना पळून जाण्यास केली होती मदत..

Two policemen were suspended who helped the accused escape | आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

googlenewsNext

पुणे : न्यायालयात हजर करुन पुन्हा कारागृहात नेण्याऐवजी परस्पर पिंपरीला नेणाऱ्या व तेथून आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.
पोलीस शिपाई विजय आनंदराव माढंरे आणि पोलीस हवालदार सूर्यनारायण थंबराज नायडू अशी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 
हे दोघे मुख्यालयात नेमणुकीला असताना संतोष चिंतामणी चांदीलकर, राजू महादेव पात्रे आणि संतोष मच्छिंद्र जगताप या तिघांनी १० एप्रिल २०१७ रोजी मोरवाडी पिंपरी येथून पलायन केले होते. मात्र, या दोघांनी हवालदार संजय काशिनाथ चंदनशिव यांच्यामार्फत संगनमताने जुना कात्रज घाट येऊन ते पळून गेल्याची खोटी फिर्याद दाखल केली होती. ही बातमी त्यावेळी मोठी चर्चेची ठरली होती.
पोलीस पार्टी म्हणून तिघा आरोपींना खंडाळा येथील न्यायालयात हजर करुन पुन्हा कारागृहाच्या स्वाधीन करण्याचा आदेश देण्यात आला होता. तरीही त्यांनी भोर येथे बिर्याणी हाऊसमध्ये गाडी थांबविली. आरोपींना जेवणाबरोबरच मद्यपान करण्यास मदत केली. जुना कात्रज घाट येथून त्यांना खासगी वाहनाने मोरवाडी पिंपरी येथे जाऊ दिले. तसेच साप्रस पोलीस चौकीजवळ त्यांची वाट पहात थांबले. त्यानंतर ते पळून गेलेले असल्याचे माहिती असताना ते जुना कात्रज घाट येऊन पळून गेल्याची खोटी फिर्याद दिली.हे सर्व कृत्य विभागीय चौकशीत निष्पन्न झाले़ त्यामुळे अशोक मोराळे यांनी माढंरे आणि नायडु यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.

Web Title: Two policemen were suspended who helped the accused escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.