भिवंडीत मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक ;दोन पीडित महिलांची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 09:59 PM2021-11-22T21:59:35+5:302021-11-22T22:00:06+5:30

Crime News: मुंबई नाशिक महामार्गावर एका मसाज पार्लरच्या स्पा सेंटरवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने रविवारी रात्री छापा मारून वेश्या व्यवसायाचा फर्दाफ़ाश केला आहे.  या पथकाने केलेल्या छापेमारीत दोन बळीत महिलांची सुटका केली आहे.

Two arrested for running prostitution business in Bhiwandi massage parlor; two victim women released | भिवंडीत मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक ;दोन पीडित महिलांची सुटका 

भिवंडीत मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक ;दोन पीडित महिलांची सुटका 

Next

भिवंडी  - मुंबई नाशिक महामार्गावर एका मसाज पार्लरच्या स्पा सेंटरवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने रविवारी रात्री छापा मारून वेश्या व्यवसायाचा फर्दाफ़ाश केला आहे.  या पथकाने केलेल्या छापेमारीत दोन बळीत महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात  विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सपना शर्मा (वय ३४) अमित जगताप (वय २९) असे मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यादोघा आरोपींची नावे आहेत.

तालुक्यातील पिंपळास ग्रामपंचायत हद्दीत मुबंई - नाशिक महामार्गावर भूमि वर्ल्ड कमर्शियकल कॉम्प्लेक्समधील मेन गेटवर 'त्वचा वेलनेस युनिसेक्स स्पा' नावाचे आरोपीचे मसाज सेंटर आहे. या मसाज पार्लरमध्ये महिलांकडून अनैतिक शारीरिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारवर मसाज पार्लर सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवला होता. त्यांनतर याठिकाणी बळीत महिलांकडून आर्थिक फायद्यासाठी  वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री होताच पोलीस कर्मचाऱ्यांनी या मसाज सेंटरवर छापा मारून दोघा जोडीला रंगेहात पकडले असून त्यांच्या तावडीतून दोन  बळीत महिलांची सुटका केली आहे.

ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान चौधरी यांच्या तक्रारीवरून या दोन्ही आरोपींवर कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमासह पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.  तर दोन  बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली असून आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनवाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली आहे. 

Web Title: Two arrested for running prostitution business in Bhiwandi massage parlor; two victim women released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.