शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी कंपनीतील दोन जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:22 PM2021-06-14T20:22:32+5:302021-06-14T20:23:20+5:30

Bribe Case : मुक्ताईनगर तालुक्यात १५ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान  झाले होते

Two arrested for accepting bribe of Rs 28,000 from farmers | शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी कंपनीतील दोन जणांना अटक 

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी कंपनीतील दोन जणांना अटक 

Next
ठळक मुद्देविनायक रामचंद्र पाटील  (२५) आणि जितेंद्र सुभाष महाजन (२७, दोघे रा. रावेर)  अशी या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.   

मुक्ताईनगर जि. जळगाव : शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना  खासगी विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना कर्की ता. मुक्ताईनगर येथे सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.  विनायक रामचंद्र पाटील  (२५) आणि जितेंद्र सुभाष महाजन (२७, दोघे रा. रावेर)  अशी या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.   

मुक्ताईनगर तालुक्यात १५ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान  झाले होते. यात शेतीतील नुकसान जास्त दाखवून जास्त नुकसान भरपाई मिळावी. यासाठी हे दोघे जण शेतकऱ्यांकडून एकराप्रमाणे पैसे घेत होते. प्रवीण महाजन या  शेतकऱ्याकडून २८ हजार रुपये घेताना या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

Web Title: Two arrested for accepting bribe of Rs 28,000 from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.