two and half old child girl kidnapped and killed in sangvi | सांगवीत अडीच वर्षाच्या चिमुकलीचा अपहरण करून खून
सांगवीत अडीच वर्षाच्या चिमुकलीचा अपहरण करून खून

ठळक मुद्देचिमुकलीचे अपहरण करून  खून केल्याची पोलिसांकडून शक्यता याबाबत अधिकची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येणार

पिंपरी : अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सांगवी येथे मंगळवारी उघडकीस आली. 
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासर, मयत अडीच वर्षाची चिमुकली पिंपळे सौदागर येथील कामगार वसाहतीमध्ये राहत होती.  सोमवारी चिमुकली राहत्या घरातून सायंकाळी बेपत्ता झाली. त्यानंतर घरच्यांनी परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलिटरी परिसरात आढळून आला. सांगवीपोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. चिमुकलीचे अपहरण करून  खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का? याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येणार आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Web Title: two and half old child girl kidnapped and killed in sangvi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.