twenty-seven kg Ganja seized at manjri in the Pune | पुण्यातील मांजरी येथे सत्तावीस किलो गांजा जप्त
पुण्यातील मांजरी येथे सत्तावीस किलो गांजा जप्त

पुणे (मांजरी) : मांजरी बुद्रुक येथील घुले वस्ती परिसरात गुन्हे शाखेच्या युनिटने सत्तावीस किलो गांजा मध्यरात्री एकच्या सुमारास पकडला. यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात धेतले आहे. सुमित बर्वे (उरुळी कांचन), पंकज रणवरे (बाणेर)  असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. नगरहुन पुण्याच्या दिशेने ऑटो रिक्षेतून गांजा घेऊन येत होते. आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखेचे पोलीस गजानन पवार, निखील पवार यांनी कामगिरी केली असून पुढील तपास हडपसर पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण हे करत आहे. एक दिवसापुर्वीच उंड्री परिसरात कोकेनसारख्या अमलीपदार्थ विक्री करण्यास आलेल्या नायजेरिया देशातून आलेल्या आरोपीला पुणेपोलिसांनी पकडण्यात आले होते. ती कारवाई होत नाही तोच त्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला आहे. 


Web Title: twenty-seven kg Ganja seized at manjri in the Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.