खळबळजनक! ओव्हर ब्रिजखाली सापडला टाईम बॉम्ब, धमकीच्या पत्रात 'मुख्यमंत्री योगीं'चे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 07:17 PM2022-01-26T19:17:59+5:302022-01-26T19:23:56+5:30

Crime News : दुसरीकडे प्रजासत्ताक दिनी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात  मनगवा आणि गंगेव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती.

Time bomb found under over bridge, name of 'Chief minister Yogi' in threatening letter | खळबळजनक! ओव्हर ब्रिजखाली सापडला टाईम बॉम्ब, धमकीच्या पत्रात 'मुख्यमंत्री योगीं'चे नाव

खळबळजनक! ओव्हर ब्रिजखाली सापडला टाईम बॉम्ब, धमकीच्या पत्रात 'मुख्यमंत्री योगीं'चे नाव

googlenewsNext

रीवा: देश आज 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दुसरीकडे प्रजासत्ताक दिनी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात  मनगवा आणि गंगेव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती. घटनास्थळावरून एक कागद सापडला आहे, ज्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव लिहिले होते. हा बॉम्ब एका पुलाखाली सापडला ज्यावर हा कागद चिकटवला होता. बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर पोलिसांनी पत्राचा तपास सुरू केला आहे.

बॉम्बमध्ये स्फोटक नव्हते
रीवाचे अतिरिक्त एसपी म्हणाले की, बॉम्ब निकामी केल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात स्फोटक नव्हते. मात्र, त्यात इलेक्ट्रिक वायर आणि डिजिटल घड्याळ बसवण्यात आले होते. पुलाखाली त्याला पूर्णपणे टाईम बॉम्बचा आकार देण्यात आला होता. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


रीवा हे उत्तर प्रदेशला लागून आहे
उल्लेखनीय आहे की, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना, उत्तर प्रदेशला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात असामाजिक घटक दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत आहेत. रीवा ते बनारस-अलाहाबादला जोडणाऱ्या रीवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-३० वर दोन वेगवेगळ्या ठिकाणी मांगवन आणि गंगेवजवळील पुलाखाली बुधवारी सकाळी टाईम बॉम्ब सापडले. माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सीएम योगी यांचा उल्लेख केला
सतर्कतेने पोलीस घटनास्थळी पोहोचले, बॉम्ब निकामी पथकाने वेळीच बॉम्ब निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. बॉम्बसोबतच एक धमकीचे पत्रही सापडले असून, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्र भिंतीवर चिकटवले. मीडिया रिपोर्ट एडीजीपी केपी व्यंकटेश राव यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भात काही समाज विघातक घटकांनी हे कृत्य केले आहे. आम्ही यूपीच्या डीजीपींना कळवले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.


पत्रात लिहिले आहे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे थांबवू शकतात, असा इशारा पत्रातून दिला आहे. बाकी माहिती 8/112022 बॉटल बॉम्बच्या आत आहे, प्रयागराज पोलीस नाही तर गाडी आणि बस जाळणार.

Web Title: Time bomb found under over bridge, name of 'Chief minister Yogi' in threatening letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.