संतापजनक! राष्ट्रध्वज जाळून बनवत होते टिकटॉक व्हिडीओ, एक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:24 PM2020-06-22T20:24:55+5:302020-06-22T20:28:09+5:30

अटक आरोपी आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Tiktok video was making of burning the national flag, one arrested | संतापजनक! राष्ट्रध्वज जाळून बनवत होते टिकटॉक व्हिडीओ, एक अटकेत

संतापजनक! राष्ट्रध्वज जाळून बनवत होते टिकटॉक व्हिडीओ, एक अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देअटक आरोपी आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अटक आरोपी हा सपाच्या माजी नेत्याच्या पुतण्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

लखनऊमधील बाजारखाला येथील टिकैतराय तलावावर काही अराजकता माजवणारे घटक राष्ट्रध्वज जाळून टिकटॉक व्हिडिओ बनवत होते. त्यापैकी एका तरुणाला स्थानिकांनी पोलिसांकडे पकडून दिले तर इतर तीन तरुणांनी पळ काढला. अटक आरोपी आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक विजयेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाजीपुरम येथे राहणारे रविकांत सिंह सायंकाळी टिकैतराय तलावाजवळ सायकल चालवत होता. दरम्यान, त्याने अटक आरोपी आणि तीन तरुणांना राष्ट्रध्वज जाळताना पाहिले. तसेच देशविरोधी घोषणा देत होते. रविकांत यांनी या तरुणांना हटकल्यावर चौघांनी त्याच्यावर हल्ला केला. गोंधळ ऐकून रूपेश गुप्ता नावाचा तरुण घटनास्थळी आला. गुप्ताच्या मदतीने रविकांत यांनी एका मुलाला पकडले. तर त्याचे तीन साथीदार फरार झाले. थोड्या वेळातच लोक जमा झाले. प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अटक तरुणाने तो टिकटॉकवर व्हायरल कारण्यासाठी व्हिडिओ बनवत होता असं सांगितले. 



तरुणाच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी अन्य तीन तरुणांचा शोध सुरू केला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अटक आरोपी हा सपाच्या माजी नेत्याचा पुतण्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याचवेळी तरुणाला पकडल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीला सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

Web Title: Tiktok video was making of burning the national flag, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.