पोलिसांवर दगडफेक; २३ जणांवर गुन्हा, मुंब्य्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:20 AM2020-05-15T02:20:52+5:302020-05-15T02:21:40+5:30

फेमस कॉलनी भागातील साईकिरण सोसायटीमध्ये राहत असलेल्या पटेल कुटुंबाने विक्रीसाठी आणलेल्या मांजरीचा आम्हाला त्रास होतो. तिला तुम्ही घरातच ठेवा, असे सोसायटीमध्ये राहत असलेल्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबाला सांगताच वादावादी झाली.

Throwing stones at police; Crime against 23 persons, incident in Mumbai | पोलिसांवर दगडफेक; २३ जणांवर गुन्हा, मुंब्य्रातील घटना

पोलिसांवर दगडफेक; २३ जणांवर गुन्हा, मुंब्य्रातील घटना

googlenewsNext

मुंब्रा : हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची, तसेच पोलीस शिपायाच्या खाजगी वाहनाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी रात्री मुंब्य्रात घडली. याप्रकरणी एकूण २३ जणांसह अनोळखी जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेमस कॉलनी भागातील साईकिरण सोसायटीमध्ये राहत असलेल्या पटेल कुटुंबाने विक्रीसाठी आणलेल्या मांजरीचा आम्हाला त्रास होतो. तिला तुम्ही घरातच ठेवा, असे सोसायटीमध्ये राहत असलेल्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबाला सांगताच वादावादी झाली.

या वेळी संतप्त झालेला नासीर पटेल, तसेच त्याची मुले फहाद, फरहान, परेश, फराज तसेच जरीना आणि आरीफ पतंगवाला यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी परेशने मोबाइल हिसकावला, तसेच फहादने विनयभंग केल्याची तक्रार यास्मीनने दाखल केली आहे.
हे भांडण सोडविण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई मयूर लोखंडे तसेच अन्य पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. यात लोखंडे याच्या पायाला मार लागला असून, पोलीस शिपाई परब यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. घटनेचे चित्रण करीत असलेल्या इस्माईल खान याचा कॅमेरा अनोळखी व्यक्तीने चोरून नेला. याबाबत लोखंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
 
Web Title: Throwing stones at police; Crime against 23 persons, incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.