आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन किलो हेरॉईन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:56 AM2021-02-19T03:56:24+5:302021-02-19T03:56:41+5:30

heroin seized at international airport : आफ्रिकेतून येत असलेल्या महिला प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती ‘एनसीबी’च्या मुंबईतील पथकाला मिळाली हाेती.

Three kg of heroin seized at international airport | आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन किलो हेरॉईन जप्त

आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन किलो हेरॉईन जप्त

googlenewsNext

मुंबई : दक्षिण आफ्रिकेहून मुंबईत आलेल्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेकडून तब्बल २.९६० किलो हेराईन जप्त करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. खानसिले प्रॉमिस खलिशवायो असे या तस्कर महिलेचे नाव असून, मुंबईतील उच्चभ्रू वर्तुळात ती हेराॅईन विकण्यासाठी घेऊन आल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आफ्रिकेतून येत असलेल्या महिला प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती ‘एनसीबी’च्या मुंबईतील पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार गुरुवारी पहाटेपासून अधिकारी विमानतळावर पाळत ठेवून होते. कतार एअरवेजच्या ०५५६ या क्रमांकाच्या जोहान्सबर्गहून दोहामार्गे मुंबईत आलेल्या फ्लाईटमधील खानिसिले प्रॉमिस खलिशवायो हिच्याकडील सामानाची विमानतळावरील तपासणी कक्षामध्ये झडती घेतली असता, राखाडी रंगाच्या बॅगेत वरच्या आवरणाच्या पोकळीत हेरॉईनची दोन पाकिटे तर बॅगेत एक पाकीट लपविलेले आढळले. त्याचे एकूण वजन २.९६० किलो आहे.
तिच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी) आणि २१ (सी)चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ती मुंबईत कोणाकडे या पदार्थांची डिलिव्हरी करणार होती, यापूर्वी तिने अशाप्रकारे अमली पदार्थांची तस्करी केली आहे का, तिचे अन्य कोण साथीदार आहेत, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Three kg of heroin seized at international airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.