बनावट हमीपत्राद्वारे साडेतीन कोटीना तिघांनी घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:40 PM2020-08-15T14:40:13+5:302020-08-15T14:40:31+5:30

या फसवणूक प्रकरणी सारडा सर्कल येथे राहणाऱ्या इस्लाम इकबाल खान यांनी तक्रार दाखल केली आहे.

Three and a half crores were duped on fake guarantee letter | बनावट हमीपत्राद्वारे साडेतीन कोटीना तिघांनी घातला गंडा

बनावट हमीपत्राद्वारे साडेतीन कोटीना तिघांनी घातला गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देसिडकोत राहणाऱ्या 3 संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमी पत्र व संमती पत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सर्व कायदेशीर वारसदारांना रस्ता चौपदरीकरण भूसंपादनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेवर काही एक अधिकार नसताना सुमारे तीन कोटी 48 लाख 90 हजार रुपयांची रक्कम स्विकारून अपहार करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या 3 संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या फसवणूक प्रकरणी सारडा सर्कल येथे राहणाऱ्या इस्लाम इकबाल खान यांनी तक्रार दाखल केली आहे. सिडको येथे राहणाऱ्या संशयित आरोपी अफजल अख्तर खान, शब्दात अफजल खान व शफी नूर मोहम्मद खान या तिघांनी संगनमत करून जुलै 2014 ते डिसेंबर 2018 या कालावधीत गट नंबर 670 सर्वे नंबर 141 नाशिक महानगरपालिका हद्द आडगाव शिवारात असलेल्या फिर्यादीच्या एकूण क्षेत्र 22 आर मिळकतीच्या विकास करार नाम्यावर फिर्यादी व त्याचे वडील यांना रस्ता भूसंपादन माध्यमातून मिळणाऱ्या साडेतीन कोटी रुपयांची रक्कम स्वीकारून खोटे दस्तऐवज संमती पत्र तयार  करत बांधकाम विकास आराखड्यात बेकायदेशीरपणे बदल करून फसवणूक केली सदर बाब फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली सैनिकीबाबत तक्रार दाखल केली याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बिडकर तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

 

स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

 

एक अधिकाऱ्यासह 13 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक

Web Title: Three and a half crores were duped on fake guarantee letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.