मांगले येथे रोख रक्कमेसह १५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 10:05 PM2020-11-25T22:05:08+5:302020-11-25T22:05:18+5:30

डॉ.  बी. एन. पाटील शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) रोजी दवाखाण्याला कुलूप लावून कुटुंबासह सर्वजन का-हाड येथे नातेवाईकांच्या कडे गेले होते

Theft of gold jewelery worth Rs 15 lakh along with cash at Mangle | मांगले येथे रोख रक्कमेसह १५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

मांगले येथे रोख रक्कमेसह १५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

Next

मांगले - येथील डॉ.बी.एन.पाटील यांच्या गंधा नर्सिंग होम दवाखान्याच्या पहिल्या मजल्यावरील बंगल्याच्या दाराची कुलपाची कडी उचकटून  लॉकरमधील २९ तोळे सोने,  दहा भार चांदी  व रोख ५० हजार  रुपयांची रक्कम अशी एकूण १५  लाखांच्या मुद्देमालाची जबरी चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना आज दुपारी  उघडकीस आली. या वर्षातील ही चोरीची दुसरी घटना आहे ३१ डिसेंबर च्या रात्री मुख्य बाजारपेठेतील एटीएम मशीन चोरट्यांनी कटरच्या सहायाने कापून अडीच लाखाची रोख रक्कम लंपास केली होती त्याचा अद्याप छडा लागलेला नाही.

 डॉ.  बी. एन. पाटील शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) रोजी दवाखाण्याला कुलूप लावून कुटुंबासह सर्वजन का-हाड येथे नातेवाईकांच्या कडे गेले होते .आज सकाळी ११ वाजता शेजारी राहणाऱ्या लोकांना   दवाखान्याचा दरवाजा उघडा दिसला. डॉक्टर आलेले नाही मग दरवाजा उघडा कसा काय?  शँका आल्याने त्यांनी  डॉ.पाटील यांना दूरध्वनिवरून संपर्क साधला. त्यांनी तातडीने धाव घेतली असता चोरट्यानी दवाखान्याचे  व पहिल्या मजल्याचें कुलूप उचकटून डॉ.राहत असलेल्या  बेडरूम मधील लॉकर शेजारी असणा-या टेबलमधील लॉकरच्या चाव्या शोधून घेवून  त्यामधील सर्व साहित्य खोलीभर विस्कटलेले दिसले पाहणी केली असता २९ तोळे सोन्याचे दागिने, दहा भार चांदी व  ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास  केलयाचे निदर्शनास आले. यावेळी चोरट्यानी  तेजोरीतील कपडे व इतर समान अस्ताव्यस्त विस्कटून टाकले होते, वारणा  रस्त्यालगत  पूर्वेला इनाम पाणंद रस्त्यावर डॉ.पाटील यांचा  गंधा नर्सिंग होम दवाखाना  आहे व पहिल्या मजल्यावर ते राहतात. डॉ.पाटील शनिवारी कुटुंबासह का-हाड येथे नातेवाईकांच्या कडे गेले होते ,चोरट्यानी याच संधीचा फायदा घेवून डल्ला मारला ,मात्र  शनिवार ते मंगळवार दरम्यान नेमकी कोणत्या दिवशी चोरी झाली आहे हे समजू शकलेले नाही,

  डॉ.पाटील यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ शिराळा पोलिसांना कळविले त्यांनतर शिराळा पोलीस घटनास्थळी दाखल होवू न पंचनामा केला.  बुधवारी सायंकाळी सांगलीहून  श्वान पथक मागविण्यात आले , श्वानाने वारणानगर रोडवर दोनशे मिटर पर्यंत माग दाखवला व त्याच परिसरात घुटमळले, त्यामुळे चोरटे वाहनाने गेल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशीरा  शिराळा पोलीस ठाण्यात  दाखल झाला . मात्र चोरट्यांचा  कोणताही सुगावा अद्याप लागला नसला तरी चोरट्यांना डॉ.परगावी गेल्याचे माहिती असल्यामुळे पाळत ठेवून चोरी केली  असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.

डायरी हवालदार कुठे गेला माहित नाही...

मांगले येथे चोरी झाल्याचे दुपारी उघडकीस आले सायंकाळी श्वानपथक येऊन गेले रात्री साडेसात वाजेपर्यंत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हाच नोंद नव्हता त्यामुळे फिर्यादीची अचुक माहिती मिळत नव्हती यावेळी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता याबाबत काही माहिती नाही  ठाणा अंमलदार कुठे गेले आहेत? याची मला माहिती नसल्याचे माने नामक मदतनीस पोलिसाने सांगितले. तर रात्री प्रभारी अधिकारी यांना फोन केला असता अजून फिर्याद घेतली नसल्याचे सागीतले दुपारी घटना उघडकीस येऊनही रात्री पर्यंत गुन्हा दाखल न करण्यामागचे शिराळा पोलिसांचे गौडबंगाल काय ? अशी चर्चा आहे

Web Title: Theft of gold jewelery worth Rs 15 lakh along with cash at Mangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस