मृतदेहांवरील कापडांची चोरी पकडली गेली; १० वर्षांपासून करत होते मानवतेला काळिमा फासणारे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:52 PM2021-05-11T20:52:58+5:302021-05-11T20:53:35+5:30

Crime News : ही टोळी मानवतेला काळिमा फासण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

The theft of clothes from the dead bodies was caught; He has been committing acts of disgrace to humanity for the last 10 years | मृतदेहांवरील कापडांची चोरी पकडली गेली; १० वर्षांपासून करत होते मानवतेला काळिमा फासणारे कृत्य 

मृतदेहांवरील कापडांची चोरी पकडली गेली; १० वर्षांपासून करत होते मानवतेला काळिमा फासणारे कृत्य 

Next
ठळक मुद्देमृतदेहांवरील कपड्यांची चोरी करून ते बाजारात विकणाऱ्या टोळीच्या सात सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बागपत (उत्तर प्रदेश) : कब्रस्तानमधून कफन व स्मशान घाटावर मृतदेहांवरील कपड्यांची चोरी करून ते बाजारात विकणाऱ्या टोळीच्या सात सदस्यांना पोलिसांनीअटक केली आहे. ही टोळी मानवतेला काळिमा फासण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बागपतच्या बड़ौत कोतवाली भागातील आहे जेथे या टोळीने कोविड -१९ चा संसर्ग पसरविण्याचा धोका वाढविला होता. बड़ौत पोलिस अधिकारी आलोक सिंह म्हणाले की, या प्रकरणात एक कापड व्यापारी आणि त्याचे इतर सहकारी स्मशानघाट आणि कब्रस्तान येथून मृतदेहावर ठेवलेल्या चादरी आणि कपड्यांची चोरी करून त्यांना इस्त्री केली जात असे. ते कपडे  इतर कंपन्यांचा लोगो म्हणजे ट्रेडमार्क लावून विक्री केली जायची.

३०० रुपयांच्या लालसेपोटी जीवाची काळजी नाही 

गेल्या दहा वर्षांपासून आरोपी या कामात सामील असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींना दररोज सुमारे तीनशे रुपये या कामासाठी दिले जात होते. शनिवारी स्थानिक कापड व्यापारी प्रवीण जैन, त्याचा मुलगा, पुतण्यासह राजू शर्मा, श्रावण शर्मा, बबलू कश्यप, शाहरुख खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बड़ौत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या आरोपींवर महामारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: The theft of clothes from the dead bodies was caught; He has been committing acts of disgrace to humanity for the last 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.