पेरणेफाटा येथे एटीएम फोडून २१ लाखांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 12:53 PM2019-06-17T12:53:22+5:302019-06-17T12:55:01+5:30

आयडीबीआय बँकेकडून सुरक्षिततेबाबत काळजी नाही. घटना घडून एक दिवस उलटला तरी बँकेचे अधिकारी आले नाहीत..

theft of 21 lakhs in ATM machine at lonikand | पेरणेफाटा येथे एटीएम फोडून २१ लाखांची लूट

पेरणेफाटा येथे एटीएम फोडून २१ लाखांची लूट

Next

लोणीकंद : पुणे-अहमदनगर रस्त्यावर  पेरणेफाटा  येथे  हमरस्त्यालगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
आयडीबीआय बँकेकडून सुरक्षिततेबाबत काळजी नाही. घटना घडून एक दिवस उलटला तरी बँकेचे अधिकारी आले नाहीत, सुरक्षारक्षकही नाहीत, पुरेसे सीसीटीव्ही नाहीत, या निमित्ताने या गंभीर बाबी समोर आल्या आहेत. याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणेफाटा (ता. हवेली) येथे पुणे नगर हमरस्त्यालगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याची खबर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समजल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस पथक व बँकेच्या अधिकाऱ्यांसह आज सायंकाळी सातच्या सुमारास घटनास्थळी पाहणी केली. यावेळी एटीएम मशिनची एका बाजुची लोखंडी प्लेट गॅस कटरच्या सहायाने कापून एटीएम मशीन उघडल्याचे व त्यातून २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याचे निदर्शनास आले. आदल्या दिवशी २६ लाखांची रोकड भरल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.रस्त्यावर असले तरी दोन्ही बाजूने भाजी बाजार व वर्दळीचे ठिकाण असूनही चोरी झाली.
काल दुपारी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅन पथकाला शटर अर्धवट बंद दिसल्याने पथकाने ही घटना बँकेला कळवली. दरम्यान बँकेचे अधिकारी व लोणीकंद पोलीस आज सायंकाळी आल्यानंतर ही चोरी सर्वांना समजली. दरम्यान सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
..............
दरम्यान गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री ते शुक्रवार (दि. १४) पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असावी. तसेच माहितगार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लोणी कंद पोलीस व  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पथके तयार करुन वेगाने तपास सुरु केला आहे.
.............
बँका गंभीर नाहीत. सुरक्षा गार्डची  नेमणूक केलेली नाही. पुरसे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बोर्ड दिसत नाही. बँकेने सुरक्षा काळजी घेणे 
गरजेचे आहे.- डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे

Web Title: theft of 21 lakhs in ATM machine at lonikand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.