बिहारच्या मुंगेरमध्ये एका नवविवाहित वधूने आपल्या सासरी परतण्यापूर्वी जो कांड केला, त्यामुळे नवरदेवाला अक्षरश: डोकं धरून बसावं लागलं आहे. मिठाई घेण्याचा बहाणा करून तिने पतीला दुकानात पाठवलं आणि नंतर मागून आलेल्या प्रियकराच्या बाईकवर बसून पळ काढला. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
"ऐका ना! मी सासरी रिकाम्या हाती जाणार नाहीये... चला, बाजारातून मिठाई घेऊन जाऊ," हे नववधूचे बोल ऐकून पतीला आनंद झाला होता. त्याने पत्नीच्या सांगण्यानुसार तिला घेऊन मार्केट गाठलं आणि मिठाई खरेदी करण्यासाठी दुकानात प्रवेश केला. पण, तोपर्यंत नवरीच्या मनात वेगळाच प्लॅन शिजला होता, याची त्याला कल्पना नव्हती. पती दुकानात शिरताच, मागून तिच्या प्रियकराने बाईक आणली आणि ती क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यासोबत पसार झाली.
पतीला आला थेट कॉल अन्...
नवरदेव मिठाई घेऊन बाहेर आला, तेव्हा त्याला बायको दिसली नाही. त्याने तिला खूप शोधलं, पण ती सापडली नाही. काही वेळानंतर, हताश झालेल्या पतीच्या फोनवर चक्क पत्नीचा कॉल आला. "मला तुमच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. मी माझ्या प्रियकरासोबत जातेय. मी त्याच्यासोबतच राहीन," हे शब्द ऐकताच पतीच्या पायाखालची जमीन सरकली. या धक्कादायक घटनेमुळे नवरदेवाने तातडीने सासरच्या मंडळींना याची माहिती दिली. घरात एकच हाहाकार उडाला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली आणि गावात चर्चेला उधाण आलं.
माहेरहून परतताना रचला प्लॅन
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मुंगेर येथील बरियारपूर भागातील या तरुणीचं लग्न २३ नोव्हेंबरला झालं होतं. ती २७ नोव्हेंबर रोजी पतीसोबत आपल्या माहेरी आली होती. सासरी परत जायची वेळ झाली, तेव्हा तिने हट्ट धरला की, "रिकाम्या हाती सासरी जायचं नाही, मिठाई खरेदी करायची." पतीला तिची इच्छा पूर्ण करायची होती, पण त्याच्या मनात पत्नीच्या या गोड मागणीमागे दडलेला कट लक्षात आला नाही.
नववधूने अतिशय शांतपणे आपला प्लॅन अंमलात आणला. पती दुकानात शिरताच मागच्या बाजूने बाईकवर आलेल्या प्रियकरासोबत ती फरार झाली. एवढंच नाही, तर जाताना तिने पतीला फोन करून स्पष्ट केलं की, घरच्यांच्या दबावामुळे तिने हे लग्न केलं होतं, पण तिला आयुष्यभर फक्त प्रियकरासोबतच राहायचं होतं. या प्रकरणानंतर पती एकटाच घरी परतला.
Web Summary : In Bihar, a newlywed bride fled with her lover after tricking her husband into buying sweets. She confessed via phone, leaving him devastated and sparking outrage.
Web Summary : बिहार में, एक नवविवाहित दुल्हन मिठाई खरीदने का बहाना करके पति को धोखा देकर प्रेमी के साथ भाग गई। उसने फोन पर कबूल किया, जिससे वह तबाह हो गया और आक्रोश फैल गया।