दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक

By पूनम अपराज | Published: November 17, 2020 09:37 PM2020-11-17T21:37:59+5:302020-11-17T21:40:01+5:30

Terrorist Arrested :  या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्राने दिली आहे.

Terrorist plot foiled, 2 suspected Jaish-e-Mohammed terrorists arrested | दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक

Next
ठळक मुद्दे अब्दुल लतिफ मीर आणि मोहम्मद अशरफ खतना अशी या दोघांची नावे आहेत. जम्मू काश्मीरचे निवासी असणाऱ्या या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे दोन ऍटोमॅटिक पिस्तूल आणि १० जिवंत काडतूसं सापडली आहेत.

दिल्लीपोलिसांनी मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे. तसेच जैश-ए-मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीपोलिसांच्या विशेष पथकाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्राने दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेची कारवाई करण्यासाठी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मिलेनियम पार्कजवळ सापळा रचण्यात आला होता. जम्मू काश्मीरचे निवासी असणाऱ्या या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे दोन ऍटोमॅटिक पिस्तूल आणि १० जिवंत काडतूसं सापडली आहेत.

दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. अब्दुल लतिफ मीर आणि मोहम्मद अशरफ खतना अशी या दोघांची नावे आहेत. अब्दुलचं वय २२ असून तो बारामुल्लाचा रहिवासी आहे. त्याचप्रमाणे २० वर्षीय अशरफ कुपवाडामध्ये राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी गाजीपूरमधून अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या होत्या. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचंही समोर आलं होतं. 

 

 

Web Title: Terrorist plot foiled, 2 suspected Jaish-e-Mohammed terrorists arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.