Terror Attack: बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग रचणारा ‘मुन्नाभाई’ तावडीत सापडला; मुंबई ATS नं मुंब्य्रात रचला सापळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 01:55 PM2021-09-19T13:55:35+5:302021-09-19T13:58:38+5:30

या प्रकरणात मुंबई एटीएसने झाकीर हुसैन शेख यांना अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं

Terror Attack: Munnabhai the mastermind of the bomb blast Trap set by Mumbai ATS in Mumbai | Terror Attack: बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग रचणारा ‘मुन्नाभाई’ तावडीत सापडला; मुंबई ATS नं मुंब्य्रात रचला सापळा

Terror Attack: बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग रचणारा ‘मुन्नाभाई’ तावडीत सापडला; मुंबई ATS नं मुंब्य्रात रचला सापळा

googlenewsNext
ठळक मुद्देदहशतवादी ट्रेनमध्ये गॅस हल्ला करण्याचं प्लॅनिंग रचत होतेदिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला. महाराष्ट्र एटीएसने झाकीर शेखला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात न देता त्याच्यावर स्वतःहून स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई – देशाला हादरवणारं मोठं षडयंत्र भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे टळलं आहे. दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसनं पकडलेल्या ६ दहशतवाद्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे उघड होत आहेत. आता या प्रकरणात मुंबई एटीएसनं बॉम्ब स्फोटाचा कट रचणाऱ्या एका आरोपीला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. पकडलेल्या या संशयित दहशतवाद्याचे नाव इमरान उर्फ मुन्नाभाई सांगितलं जात आहे.

छापेमारी दरम्यान एटीएसला यश

या प्रकरणात मुंबई एटीएसने झाकीर हुसैन शेख यांना अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं. ज्यानंतर मुंब्रा परिसरात ATS ने छापेमारी केली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रेनमध्ये गॅस हल्ला करण्याचं प्लॅनिंग रचत होते. या अलर्टनंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व मोठ्या रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त इतर सर्व गेट्स बंद करण्यात आले. त्यात एटीएसनं इमरान उर्फ मुन्नाभाईला अटक करुन कोर्टात हजर केले.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला. त्यावेळी ६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत जोगेश्वरी येथून एका संशयिताला पकडलं होतं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जाकीरनं पकडलेल्या दहशतवादी मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया याच्याकडून हत्यारं आणि स्फोटकं घेतली होती. दहशतवाद्यांच्या चौकशीत मुंबई-दिल्ली एटीएस टीम देशभरात छापेमारी करत छुप्या दहशतवाद्यांना अटक करत आहे.

महाराष्ट्र एटीएसने झाकीर शेखला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात न देता त्याच्यावर स्वतःहून स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाल्याने काही दिवस तो मुंबई एटीएसच्या ताब्यात राहील. या कारवाईमुळे दिल्ली पोलीसबरोबर त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येते. वास्तविक हा कट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला होता, तसेच झाकीरला पकडण्यासाठी मंगळवारी त्यांचे पथक मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्या तो हाती लागला नाही. एटीएसची कोठडी संपल्यानंतर त्यांना झाकीरचा ताबा मिळू शकतो. तोपर्यंत एटीएसच्या माहितीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कारवाई

चार दिवसांपूर्वी जान मोहम्मद शेखसह इतर पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एकाच वेळेस महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही कारवाई करण्यात आली होती. जान मोहम्मद हा गेल्या २० वर्षांपासून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित होता. सध्या तो अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. मुंबईसह उत्तर प्रदेश व दिल्लीत हल्ला करण्यासाठी त्यांना अहमदकडून शस्त्रास्त्रे पुरविली जाणार होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आल्याने त्याची महाराष्ट्र एटीएसने गंभीर दखल घेत त्याचा स्वतंत्र तपास सुरू केला होता. त्यामध्येच आता आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Terror Attack: Munnabhai the mastermind of the bomb blast Trap set by Mumbai ATS in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.