The teacher's heinous act; The student was teased by showing obscene video, the family slapped her with slippers and shoes | शिक्षकाचं घृणास्पद कृत्य; अश्लील Video दाखवून विद्यार्थिनीला छेडलं, कुटुंबीयांनी जोड्याने हाणलं

शिक्षकाचं घृणास्पद कृत्य; अश्लील Video दाखवून विद्यार्थिनीला छेडलं, कुटुंबीयांनी जोड्याने हाणलं

ठळक मुद्देयामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आणि कुटुंबीयांनी आणि लोकांनी मिळून प्रथम शिक्षकाला मारहाण केली आणि त्याचा चेहरा काळे केले.

चंदीगड - पंजाबमधील फागवारा येथे एका खासगी शाळेतील शिक्षकाने त्याच्या एका विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी ही विद्यार्थिनी आपल्या कुटुंबासमवेत शाळेत पोहोचली आणि शिक्षकाला शाळेतून काढून टाकण्याची मागणी कुटुंबीयांनी केली.

यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आणि कुटुंबीयांनी आणि लोकांनी मिळून प्रथम शिक्षकाला मारहाण केली आणि त्याचा चेहरा काळे केले. त्यानंतर त्याला मुख्याध्यापकांकडे नेले. प्रकरण शहरातील सुभाष नगरच्या एसडी मॉडेल स्कूलचे आहे. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?


कुटुंबातील सदस्यांचा असा आरोप आहे की, तिच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षिकाद्वारे त्यांची छेड काढण्यात आली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नातेवाईकांनी सांगितले आहे की, त्यांची मुलगी शाळेतच शिक्षकाकडून शिकवणीसाठी जात होती. सोमवारी, जेव्हा तिची मुलगी शिकवणी घेण्यासाठी आली होती, तेव्हा शिक्षक विकासने तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखविला. असा आरोप केला जातो की, शिक्षकाने तिच्यावर अश्लील कृत्यही केले. या घटनेची माहिती विद्यार्थिनीने मंगळवारी तिच्या कुटुंबातील सदस्यांना दिली.


बैसाखी व आंबेडकर जयंतीमुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी शाळा सुरू झाली. तेव्हा कुटुंबातील सदस्य विद्यार्थिनीला घेऊन शिक्षकाला शोधत शाळेत आले आणि शिक्षकांना मारहाण केली. आरोपी शिक्षक हिमाचल येथील रहिवासी आहे. शाळेची विश्वासार्हता वाचवण्यासाठी शाळेने तातडीने शिक्षकाला काढून टाकले. स्टेशन शहर प्रभारी नवदीप सिंह यांचे म्हणणे आहे की, आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी तपास सुरू आहे.


दुसरीकडे जबरदस्तीने लग्नाच्या उद्देशाने लुधियानाच्या वेगवेगळ्या भागातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करून दोन जणांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: The teacher's heinous act; The student was teased by showing obscene video, the family slapped her with slippers and shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.