मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून शंभरवेळा शारीरिक संबंध, शिक्षिकेला झाली ६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:00 AM2021-12-02T09:00:34+5:302021-12-02T09:00:53+5:30

Crime News: मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून त्याच्याशी शंभरवेळा शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षिकेला २०२० मध्ये फ्लोरिडात अटक करण्यात आली होती.

The teacher was sentenced to 6 years in prison, often having sex with a student | मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून शंभरवेळा शारीरिक संबंध, शिक्षिकेला झाली ६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून शंभरवेळा शारीरिक संबंध, शिक्षिकेला झाली ६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

googlenewsNext

वॉशिंग्टन :   मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून त्याच्याशी शंभरवेळा शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षिकेला २०२० मध्ये फ्लोरिडात अटक करण्यात आली होती.  वृत्तानुसार तिने हायस्कूलमधील विद्यार्थ्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. सुरुवातीला सांगण्यात आले की, पीडित विद्यार्थ्याचे वय १५ वर्षे आहे; परंतु, कोर्टाने त्याचे वय १२ वर्षापेक्षा जास्त आणि  १६ वर्षांपेक्षा कमी असल्याचे मानले. कोर्टाच्या दस्तावेजात म्हटले आहे की, आरोपी शिक्षिकेची लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंद केली जाईल आणि तुरुंगवासानंतर तिला वेगळी शिक्षा दिली जाईल.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार तिने आपल्या मुलाच्या मित्राशी वर्षभरात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दररोज ती त्याच्याशी घरी, कार आणि चौपाटीवर शारीरिक संबंध ठेवायची.   एस्कॅम्बिया काऊंटी स्कूलचे जिल्हा अधीक्षक माल्कम थाॅमस यांनी सांगितले की, या शिक्षिकेने जे. ई. हॉल सेंटरमधील  संसाधन शिक्षण तज्ज्ञपदाचा राजीनामा दिला आहे. या शिक्षिकेच्या मुलाच्या मित्रानेही  एक वर्षाहून अधिक काळ तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. त्या मुलाचे वय १५ वर्षे आणि महिलेचे वय ३९ वर्षे असल्यापासून दोघांनी संबंध ठेवले. यादरम्यान शिक्षिकेने त्याला मुलाला आयफोनसह किमती चीजवस्तू भेट दिल्या.

Web Title: The teacher was sentenced to 6 years in prison, often having sex with a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.