तिकीट मागितल्यामुळे नागपूर विभागात टीसीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:46 PM2020-01-15T23:46:18+5:302020-01-15T23:47:53+5:30

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत मुख्य तिकीट निरीक्षक लोकेंद्र बावसे यांनी यशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील विनातिकीट प्रवाशांना तिकीट मागितले असता त्यांनी बावसे यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बैतूल-इटारसीदरम्यान घडली.

TC beaten up in Nagpur area for demanding ticket | तिकीट मागितल्यामुळे नागपूर विभागात टीसीला मारहाण

तिकीट मागितल्यामुळे नागपूर विभागात टीसीला मारहाण

Next
ठळक मुद्देयशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत मुख्य तिकीट निरीक्षक लोकेंद्र बावसे यांनी यशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील विनातिकीट प्रवाशांना तिकीट मागितले असता त्यांनी बावसे यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बैतूल-इटारसीदरम्यान घडली.
लोकेंद्र बावसे रेल्वेगाडी क्रमांक २२३५२ यशवंतपूर-पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्यासोबत आणखी सहा तिकीट तपासणीस होते. ते एस ६ कोचमध्ये तिकीट तपासणी करीत असता, त्यांना काही प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांनी तिकीटाबाबत विचारणा करून तिकिटाची रक्कम देऊन पावती फाडण्यास सांगितले. त्यामुळे आरोपींनी बावसे यांना मारहाण सुरू केली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तिकीट तपासणी कर्मचारी महेंद्र सिंह अणि डॅनियल फ्रान्सिस कोचमध्ये पोहोचले. गाडी बैतूल स्थानकावर पोहोचताच चार आरोपींना पकडून बैतूलला आणि चार आरोपींना इटारसी रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. लोकेंद्र बावसे यांना नागपूरच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: TC beaten up in Nagpur area for demanding ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.