संशयाने घेतला पतीचा जीव, कापलेलं मुंडकं घेऊन गाठलं पोलीस ठाणं; उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 02:04 PM2022-01-21T14:04:11+5:302022-01-21T14:06:19+5:30

Murder of Husband : एवढेच नाही तर यानंतर ती रविचंदरचे कापलेलं मुंडकं घेऊन  स्थानिक पोलिस ठाण्यातही गेली आणि आत्मसमर्पण केले.

Suspicion took husband's life, reached police station with cuted head | संशयाने घेतला पतीचा जीव, कापलेलं मुंडकं घेऊन गाठलं पोलीस ठाणं; उडाली खळबळ

संशयाने घेतला पतीचा जीव, कापलेलं मुंडकं घेऊन गाठलं पोलीस ठाणं; उडाली खळबळ

Next

हैदराबाद - एका ५० वर्षीय महिलेने अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी वसुंधरा हिने तिचा ५३ वर्षीय पती रविचंदर याची चाकूने निर्घृण हत्या केली आहे. एवढेच नाही तर यानंतर ती रविचंदरचे कापलेलं मुंडकं घेऊन  स्थानिक पोलिस ठाण्यातही गेली आणि आत्मसमर्पण केले.

तिरुपतीच्या रेनिगुंटा येथे गुरुवारी ही घटना उघडकीस आली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. वसुंधरा यांचे २५ वर्षांपूर्वी बिझनेसमन रविचंदरसोबत लग्न झाले होते. त्यांना २० वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर तो रेनिगुंटाच्या बुग्गा स्ट्रीट येथे राहत होता. अलीकडे त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले होते, पण अचानक दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. गुरुवारीही रात्री उशिरा घरी आलेल्या रविचंद्रन आणि वसुंधरा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

'व्हॅलेंटाइन डे'ला प्रेयसीशी लग्न करायचे होते, टीव्हीवरचा क्राईम शो पाहून रचला कट

खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी वसुंधरा यांनी रविचंदरचा सपासप वार करून खून केला. वसुंधरा हिने डोके कापले. यानंतर तिने रविचंद्रचे डोके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळले आणि ऑटोमधून पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरुपती रुई रुग्णालयात पाठवला. या हत्येमागचा संपूर्ण माहिती आणि हेतू अद्याप पोलिसांना समजू शकलेला नाही. पण असे मानले जाते की, वसुंधरा हिला रविचंद्रचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि त्यावरून ती भांडत असे.

Web Title: Suspicion took husband's life, reached police station with cuted head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.