Sushant Singh Rajput Case : रियाच्या जबाबातून खुलासा, सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 08:35 PM2020-09-08T20:35:59+5:302020-09-08T20:36:44+5:30

Sushant Singh Rajput Case : सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते. 

Sushant Singh Rajput Case: Rhea's reply reveals that Sushant has been addicted to drugs for four years | Sushant Singh Rajput Case : रियाच्या जबाबातून खुलासा, सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन

Sushant Singh Rajput Case : रियाच्या जबाबातून खुलासा, सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन

googlenewsNext
ठळक मुद्देकोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी हा आक्षेप नोंदविला आहे. एजन्सीने दोघेजण शोविकला गांजा पुरवित असल्याचा आरोप ठेवला आहे.

मुंबई - सुशांत सिंग राजपूतला 2016 पासून अमली पदार्थाचे व्यसन होते, तेव्हा आम्ही एकमेकाच्या संपर्कातही नव्हतो, असा जबाब रिया चक्रवर्तीने अधिकाऱ्यांना दिला असल्याचे समजते. एनसीबीच्या तीन दिवसाच्या चौकशीमध्ये रियाने ड्रगच्या कनेक्शनबाबत अनेक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यामध्ये सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते. 

त्यासाठी बासित आपल्या घरी येत असल्याची कबूली दिली आहे. केदारनाथ चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी तो सेटवर ड्रग घेत होता. आपण त्याला या व्यसनापासून दूर रहाण्यासाठी वारंवार विनंती करीत होते, तो त्यासाठी तयारही होता. मात्र, मानसिक विकारामुळे त्याला ते शक्य झाले नसल्याचे तिने म्हटले आहे. 'तो गांजा सिगारेटमध्ये घालून ओढीत असे, आपण मात्र कधीच ड्रगचे सेवन केले नसल्याचा दावा तिने केला आहे.


* अधिकाऱ्यांनी दबावाने नोंदविला -  दोन तस्करांचा आरोप
दरम्यान, एनसीबीने अटक केलेल्या जैद विलीत्रा व अब्दुल बासित परीहार यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकून याप्रकरणी जबाब नोंदविल्याची तक्रार न्यायदंडाधिकाऱ्याकडे केली. कोठडीची मुदत संपल्याने  त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी हा आक्षेप नोंदविला आहे. एजन्सीने दोघेजण शोविकला गांजा पुरवित असल्याचा आरोप ठेवला आहे. त्यांनी तो फेटाळून लावित सुशांत सिंग प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचे कोर्टाला सांगितले.



रियावरील कारवाईचा घटनाक्रम


* एक ऑगस्टला सक्तवसुली संचालनालयाकडून रिया चक्रवर्ती व तिच्या कुटूंबिय व इतराविरुद्ध मनी लाऊण्डरिंग गुन्हा दाखल
* 7 ऑगस्टला रिया, शोविककडे ईडीकडून कसून चौकशी सुरु
*19 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयकडे तपास वर्ग
* 20 ऑगस्टला सीबीआयच्या 15 अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल
*21 ऑगस्टला मुंबई पोलिसांकडून तपासाची कागदपत्रे ताब्यात
*22ऑगस्ट - सुशांतच्या नोकर व मॅनेजरकडे चौकशी सुरु, फ्लॅटची पाहणी क्राईम सीन रिक्रिएट
*27 ऑगस्ट - ईडीकडून अंमली पदार्थ बाळगल्याच्या मोबाईल चॅटच्या पुराव्यानुसार रियासह सहाजणांविरुद्ध एनसीबीकडून गुन्हा दाखल
*28 ऑगस्ट - रिया, शोविक चक्रवर्तीची सीबीआयकडून कसून चौकशी सुरु, सलग पाच दिवस चौकशी
*1सप्टेंबर - एनसीबीकडून ड्रग तस्कराची धरपकड सुरु
*4 सप्टेंबर - शोविक चक्रवर्ती व सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडा यांना एनसीबीकडून अटक
5-सप्टेंबर- एनसीबीकडून सुशांतचा नोकर दीपेश सावंतला अटक
*6 सप्टेंबर - एनसीबीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु
*8 सप्टेंबर - एनसीबीच्या  तीन दिवसात 19 तासांच्या चौकशीनंतर रिया चक्रवतीला अटक

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

Web Title: Sushant Singh Rajput Case: Rhea's reply reveals that Sushant has been addicted to drugs for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.