Sushant Singh Rajput Case : प्रसारमाध्यमांनी संयम, जबाबदारीने वार्तांकन करावे - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 08:34 PM2020-09-03T20:34:07+5:302020-09-03T20:34:38+5:30

Sushant Singh Rajput Case : काही वृत्तवाहिन्या मुंबई पोलिसांविरुद्ध खोटा व चुकीचा प्रचार करून  सीबीआय, ईडी, एनसीबी करत असलेल्या तपासावर दबाव आणत आहेत, असा आरोप माजी आठ आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

Sushant Singh Rajput Case: Media should report with restraint and responsibility - High Court | Sushant Singh Rajput Case : प्रसारमाध्यमांनी संयम, जबाबदारीने वार्तांकन करावे - उच्च न्यायालय

Sushant Singh Rajput Case : प्रसारमाध्यमांनी संयम, जबाबदारीने वार्तांकन करावे - उच्च न्यायालय

Next
ठळक मुद्देमाजी पोलीस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरीचा, डी. के. शिवानंद, संजीव दयाळ, सतीश माथुर आणि के. सुब्रमण्यम आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. एन. जाधव, माजी अतिरिक्त महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी मिळून एक याचिका दाखल केली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचे वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा. तसेच वार्तांकनाचा तपासावर काहीही परिणाम होणार नाही, याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मीडिया ट्रायल होत असल्याचा आरोप करणाऱ्या दोन याचिकांची सुनावणी न्या.ए. ए.  सय्यद व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. दोन जनहित याचिकांपैकी एक याचिका आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी दाखल  केली आहे. प्रसारमाध्यमांनी मुंबईपोलिसांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याचा आरोप या सर्वांनी केला आहे.

माजी पोलीस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरीचा, डी. के. शिवानंद, संजीव दयाळ, सतीश माथुर आणि के. सुब्रमण्यम आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. एन. जाधव, माजी अतिरिक्त महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी मिळून एक याचिका दाखल केली आहे. तर दुसरी जनहित याचिका दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. प्रसारमाध्यमांनी खळबळजनक वार्तांकन करून नये असे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिककर्त्यांनी केली आहे.

'तपासासंदर्भात वार्तांकन करताना किंवा वृत्त प्रसिद्ध करताना प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा किंवा तपासावर काहीही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने वार्तांकन करावे, अशी आम्ही विनंती आणि अपेक्षा करतो,' असे न्यायालयाने म्हटले. या याचिकेवर सीबीआय आणि केंद्र सरकारला काय म्हणायचे आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवर १० सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली.

दरम्यान , न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिवादी असलेल्या वृत्तवाहिन्यांना पुन्हा एकदा याचिकेची प्रत देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणावर वार्तांकन करू नये किंवा वृत्त प्रसिद्ध करू नये, अशी मागणी आम्ही करत नाही. मात्र, पत्रकारितेची मूल्ये राखून वार्तांकन करावे, अशी विनंती आम्ही करत आहोत. काही वृत्तवाहिन्या मुंबई पोलिसांविरुद्ध खोटा व चुकीचा प्रचार करून  सीबीआय, ईडी, एनसीबी करत असलेल्या तपासावर दबाव आणत आहेत, असा आरोप माजी आठ आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

प्रसारमाध्यमेही या प्रकरणाचा एकप्रकारे तपास करत आहेत आणि शहर पोलिसांची बदनामी करत आहेत. या प्रकरणाचा तपास कोणती यंत्रणा करत आहे व यामध्ये कोण आरोपी आहे, याबाबत आम्हाला चिंता नाही. याप्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू असल्याने आम्हाला चिंता वाटत आहे,'  असे साठे यांनी न्यायालयाला सांगितले. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा धोक्यात आणतील अशा खोट्या, अपमानकारक आणि निंदनीय टिप्पण्या प्रसिद्ध करण्यास किंवा प्रसारित करण्यापासून माध्यमांना अडवावे, अशी मागणी याचिककर्त्यांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या तपासाचे वार्तांकन समतोल राखून करावे. तसेच ते निष्पक्ष असावे, असे निर्देश माध्यमांना द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

 

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Web Title: Sushant Singh Rajput Case: Media should report with restraint and responsibility - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.