पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना, चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:22 PM2020-06-23T18:22:54+5:302020-06-23T18:27:33+5:30

दोन महिलांवर गुन्हा दाखल..

Suicide of a married woman on suspicion of character, | पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना, चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या

पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना, चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देविकत घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते थकल्याने मानसिक तणाव

पुणे : पती अथवा सासरकडील मंडळी विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेतल्याने त्या छळाला कंटाळून त्या आत्महत्या करत असल्याचे आजवर दिसून आले मात्र, विकत घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते देताना न असल्याने झालेल्या वादात चारित्र्याचा संशय घेतल्याने मानसिक तणावातून महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ 
आंबेगाव खुर्द येथील लेकसृष्टी अपार्टमेंट ही घटना घडली होती़ याप्रकरणी ३० वर्षाच्या महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे़ 
या महिलेच्या पतीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यानुसार पोलिसांनी लेकसृष्टी अपार्टमेंटमधील दोन महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत़ त्याची पत्नी ब्युटी पार्लर चालवित होत्या़ त्यांनी सुमारे ३ वर्षापूर्वी लेकसृष्टी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विकत घेतला आहे़ त्या फ्लॅटचे हप्ते ते या दोन महिलांना वेळच्यावेळी देत होते़ 
लॉकडाऊनमुळे फिर्यादी यांचा रिक्षा व्यवसाय बंद होता़ तसेच पत्नीचे ब्युटी पार्लरही बंद होते़ त्यामुळे घरात पैशाची चणचण भासत होती़ यामुळे ते गेल्या २ महिन्यात हप्ते देऊ शकले नाही़ त्यामुळे १४ जून रोजी दोन हप्ते थकल्यावर या दोन महिलांचे फिर्यादीच्या पत्नीशी भांडणे केले़ त्यावेळी या महिलांनी तिच्यावर अश्लिल आरोप करुन तिच्या चारित्र्याचा संशय घेतला़ त्यामुळे आपण इतके चांगले काम करीत असतानाही बाहेरचे लोक आपल्या चारित्र्याविषयी असे बोलतात, हे ऐकून फिर्यादीच्या मनास धक्का बसला़ त्या मानसिक तणावात त्या घरी आल्या व त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ 
फिर्यादी हे या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी दोघा महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suicide of a married woman on suspicion of character,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.