‘त्या’ युवतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 11:22 PM2020-02-10T23:22:15+5:302020-02-10T23:22:18+5:30

रुग्णालयात भरती : नदीत उडी मारताना पोलिसांनी घेतले ताब्यात

Suicide attempt by 'that' young girl also | ‘त्या’ युवतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

‘त्या’ युवतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

Next

गडचिरोली : येथील आनंदानगर भागात वरगंटीवार कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची खबर त्यांच्या घरून निघून गेलेल्या मुलीच्या कानावर गेल्यानंतर तिनेही नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मागावर असलेल्या पोलिसांनी वेळीच तिला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.


सदर युवती ज्या प्रियकरासोबत गेली होती त्याच्यासोबत शिवमंदिरात तिने लग्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपल्यामुळे आई-वडिल आणि भावाने जीव गमावल्याच्या दु:खाने ती खचून गेली. या घटनेमुळे तीसुद्धा असे काही करू शकते म्हणून तिच्या मोबाईल लोकेशनवरून गडचिरोली पोलिसांचे पथक दुपारीच तिच्या मागावर निघाले. ती आपल्या पतीसोबत (प्रियकर) दुचाकीने चामोर्शीच्या दिशेने जात होती. पोहार नदीच्या जवळ पोलिसांनी दोघांनाही गाठले.


पोलिसांना पाहून त्या युवतीने नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी पोलिसांनी तिला गाठून तिचा जीव वाचविला. तिचा पतीही आत्महत्या करण्याची शक्यता असल्याने दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची मन:स्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असल्याचे गडचिरोली पोलिसांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Suicide attempt by 'that' young girl also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.