काय ही दुर्बुद्धी! नववीच्या विद्यार्थ्याला PUBG जिंकता येईना; आयुष्यच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 05:32 PM2020-03-19T17:32:08+5:302020-03-19T17:35:39+5:30

गोपाळगंज केंद्रीय विद्यालयातील नववी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी हिमांशु कुमार याने आत्महत्या केली.

Students lost to life after loss in PubG hanged to death for stopping playing pda | काय ही दुर्बुद्धी! नववीच्या विद्यार्थ्याला PUBG जिंकता येईना; आयुष्यच संपवले

काय ही दुर्बुद्धी! नववीच्या विद्यार्थ्याला PUBG जिंकता येईना; आयुष्यच संपवले

googlenewsNext
ठळक मुद्देगोपाळगंज शहरातील राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिमांशूच्या खोलीत तो छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. गेममुळे वेळ वाया घालवतो आणि करिअर उद्ध्वस्त होत असल्याने पालकांनी त्याला दम भरला होता.

पटना - बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील एका १४ वर्षाच्या मुलाने शुक्रवारी सकाळी PUBG या ऑनलाईन गेम खेळल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांनी दम भरल्यानंतर आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, गोपाळगंज केंद्रीय विद्यालयातील नववी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी हिमांशु कुमार याने आत्महत्या केली. गोपाळगंज शहरातील राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिमांशूच्या खोलीत तो छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

रावेतमध्ये मोबाईलवरील पबजी खेळामुळे तरुणाचा मृत्यू 

पबजी गेमच्या व्यसनापायी पुजाऱ्याने चोरल्या ३१ सायकली


गेम हरल्याने निराश
पीडितच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, हिमांशु शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत ऑनलाइन गेम खेळताना दिसला. हा गेम वारंवार हरल्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि नंतर पालकांनी त्याला फटकारले. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "मुलाने हताश झाल्याने इतके मोठे पाऊल उचलले असे दिसते." खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

चौकशीसाठी फॉरेन्सिक तज्ञांचा मदत घेतली जात आहे
एसएचओ प्रशांत कुमार राय यांनी सांगितले की, कुटुंबातील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हिमांशूचे वडील पप्पू कुमार यांची चौकशी करणार आहोत. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा (यूडी) गुन्हा दाखल केला आहे. एसएचओ म्हणाले, एफएसएलच्या पथकाने  नमुने गोळा केले. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हिमांशुला ऑनलाईन गेमची सवय होती आणि त्या गेममुळे वेळ वाया घालवतो आणि करिअर उद्ध्वस्त होत असल्याने पालकांनी त्याला दम भरला होता.

मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा
ऑनलाईन गेम्समध्ये मुलांच्या व्यसनाधीनतेच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करताना मानववंशशास्त्रज्ञ प्रा. एस. नारायण म्हणाले, "पालकांनी त्यांच्या पाल्याच्या वागणुकीत होणाऱ्या बदलावर लक्ष केंद्रित केले पाहिजे." तथापि, पालकांकडे वेळ नसल्यामुळे आणि अतिरिक्त कामांमध्ये विद्यार्थ्यांना रस नसल्यामुळे मुलांना अमली पदार्थांच्या व्यसन लागते. या प्रकरणात वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Students lost to life after loss in PubG hanged to death for stopping playing pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.