Parambir Singh :- परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:58 PM2021-05-24T12:58:35+5:302021-05-24T12:59:21+5:30

State government assures high court will not to arrest Parambir Singh till June 9 :-परमबीर सिंग यांच्यावरील गुन्हा दखलपात्र आहे आणि गंभीर गुन्हा घडल्याचे तक्रारीवरून दिसून येते, तसेच सुरू असलेल्या तपासाआड न्यायालय येऊ शकत नाही. तक्रारदाराने केलेले आरोप २०१५-१६ मधील आहेत.

State government assures high court will not to arrest Parambir Singh till June 9 | Parambir Singh :- परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

Parambir Singh :- परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

googlenewsNext
ठळक मुद्देपरमबीर यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली आहे. 

ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला होता. साेमवार, २४ मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाता ९ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी ग्वाही  राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली आहे. State government assures high court will not to arrest Parambir Singh till June 9

शुक्राची झालेल्या सुनावणीदरम्यान या याचिकेवर सुनावणी प्रलंबित असताना, आम्ही राज्य सरकारला त्यांना अटक न करण्याची सूचना करत आहोत. मात्र, ते ही सूचना विचारात घ्यायला तयार नसल्याने, आम्ही याचिकाकर्त्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे सरकारला निर्देश देत आहोत, असे न्या.एस.जे. काथावाला व न्या.एस.पी.तावडे यांच्या खंडपीठाने म्हटले होते. 

 

परमबीर सिंग यांच्यावरील गुन्हा दखलपात्र आहे आणि गंभीर गुन्हा घडल्याचे तक्रारीवरून दिसून येते, तसेच सुरू असलेल्या तपासाआड न्यायालय येऊ शकत नाही. तक्रारदाराने केलेले आरोप २०१५-१६ मधील आहेत. त्या प्रकरणाचे आणि आता या प्रकरणाचा (देशमुख यांच्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा) काहीही संबंध नाही, असे राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी.खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले, तर राज्य सरकार आपल्याला मुद्दाम लक्ष्य करून, आपल्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवत आहेत, असा सिंग यांचा दावा आहे.

 

भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणी परमबीर सिंग यांनी अडकविले होते. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचविण्यास परमबीर सिंग यांनी घाडगे यांना सांगितले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नाही, असे सांगत घाडगे यांनी परमबीर सिंग यांना नकार दिला होता. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांना निर्दोष सोडले होते. 

...अन् रात्री १२ वाजता परमबीर सिंगांना मिळालं अटकेपासून संरक्षण; काय घडलं कोर्टात?


घाडगे दांपत्याचे अंडा सेलमध्ये सव्वा वर्ष 
परमबीर सिंग यांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी  खोटे गुन्हे दाखल केले होते. एवढेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे किंवा आतंकवादी असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारगृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसताना घाडगे आणि त्यांच्या पत्नीने एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये घालविले.


२७ पोलीस अधिकारी जाळ्यात...
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

Web Title: State government assures high court will not to arrest Parambir Singh till June 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.