सेक्स रॅकेट क्वीन सोनू पंजाबनने तुरूंगात केला आत्महत्येचा प्रयत्न, वाचा ब्युटी पार्लर चालवणारी कशी बनली दिल्लीची लेडी डॉन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 01:24 PM2020-07-18T13:24:50+5:302020-07-18T13:43:10+5:30

सोनू पंजाबन ही दिल्लीची लेडी डॉन, सेक्स रॅकेट क्वीन म्हणून कुख्यात आहे. फुकरे या सिनेमातील भोली पंजाबन ही भूमिकाही सोनून पंजाबनवरून प्रेरित होती. चला जाणून घेऊ तिचा प्रवास..

Sonu punjaban tried to committed suicide in jail, All you need to know about Sonu Punjaban | सेक्स रॅकेट क्वीन सोनू पंजाबनने तुरूंगात केला आत्महत्येचा प्रयत्न, वाचा ब्युटी पार्लर चालवणारी कशी बनली दिल्लीची लेडी डॉन!

सेक्स रॅकेट क्वीन सोनू पंजाबनने तुरूंगात केला आत्महत्येचा प्रयत्न, वाचा ब्युटी पार्लर चालवणारी कशी बनली दिल्लीची लेडी डॉन!

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून सोनू पंजाबन हे नाव फारच चर्चेत आहे. तिला एका १६ वर्षाच्या मुलीचं अपहरण आणि देह व्यापार करायला लावण्याच्या एका केसमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. या केसमध्ये तिला २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती. आज तिने तुरूंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण ही सोनू पंजाबन कोण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोनू पंजाबन ही दिल्लीची लेडी डॉन, सेक्स रॅकेट क्वीन म्हणून कुख्यात आहे. फुकरे या सिनेमातील भोली पंजाबन ही भूमिकाही सोनून पंजाबनवरून प्रेरित होती. चला जाणून घेऊ तिचा प्रवास..

१० वी पास सोनू पंजाबन

एका रिपोर्टनुसार गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबनचा जन्म १९८० मध्ये एका पंजाबी परिवारात झाला. तिने १०वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि ब्यूटीशिअनचा कोर्स केला. यावेळी ती केवळ १७ वर्षांची होती. सोनूचं लग्न एका विजय नावाच्या मुलाशी लावून देण्यात आलं. तो आधीच कार चोरणार एक गुन्हेगार होता. २००४ मध्ये सोनू गर्भवती होती. पण बाळाच्या जन्माआधीत दिल्ली पोलिसांनी विजयला एनकाउंटरमध्ये मारलं. त्याच्या काही दिवसांनीच सोनूच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता ती पूर्णपणे एकटी झाली होती. तिच्यासोबत काही महिन्यांच्या मुलाशिवाय कुणीही नव्हतं.

कशी बनली सेक्स रॅकेट क्वीन

पहिल्यांदा सोनू पंजाबनला पोलिसांनी अटक केली होती तेव्हा तिने तिचा सगळा इतिहास सांगितला होता. सोनूने सांगितले होते की, जेव्हा तिचा पती मारला गेला आणि वडिलांचा मृत्यू झाला झाला तेव्हा तिच्यासमोर जगण्याचा विचार होता. त्यामुळे ती देह व्यापार करू लागली.

सेक्स रॅकेटमधून कोट्यवधींची मालकीन

सोनू पंजाबन जेव्हा पूर्णपणे वेश्यावृत्तीच्या दलदलमध्ये फसली तेव्हा तिने पंजाबन नावाने आपली ओळख बनवली. ती ग्राहकांना आणि गॅंगच्या लोकांना पंजाबन हे नाव सांगत होती. त्यानंतर तिची ओळख दीपक आणि हेमंत या दोन भावांशी झाली जे वेश्यावृत्तीशी जुळलेले होते. सोनूने आलटून पालटून दोन्ही भावांशी लग्न केलं. पण नंतर दोघांनाही पोलिसांनी ठार केलं. याचदरम्यान सोनूने २००८ मध्ये अनुपम एन्क्लेवमध्ये फ्लॅट खरेदी केला आणि अनेक घरे भाड्याने घेतली.  हेमंतच्या मृत्यूनंतर अशोक बंटी नावाच्या व्यक्तीसोबत तिने हा धंदा सुरू केला होता.

सोनू पंजाबन नाव कसं पडलं?

असे सांगितले जाते की, तिचा तिसरा पती हेमंतचं दुसरं नाव सोनू होतं. कदाचित त्याच्या मृत्यूनंतर गीता अरोराने त्याचं नाव घेतलं. सोनू पंजाबन सोबत काम केलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, ती फार वाईट स्वभावाची आहे. ती कुणालाही शिव्या देते आणि कुणालाही मारते. सोनू वेश्यावृत्तीचा व्यवसाय करून कोट्यवधींची मालकीन झाली आहे. तिचं नेटवर्क इतकं मजबूत आहे की, अनेकदा पोलिसांच्या कारवाईनंतरही ती पुन्हा धंदा सुरू करत होती.

असे सांगितले जाते की, अनेक राज्यात सोनूचं नेटवर्क होतं. सोनू देशातील पहिली महिला आहे जी कॉल गर्ल्सना सॅलरीवर ठेवते. हाय प्रोफाइल ग्राहकांकडून ती मोठी रक्कम घेत होती. पोलिसांनी सांगितले की, सोनू पंजाबनची गॅंग होम सर्व्हिस देते. यासाठी ती मुलींना कारमध्ये ड्रायव्हर आणि गार्डसोबत पाठवते.

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनच्या क्लायंट लिस्टमध्ये अनेक मोठे बिझनेसमनही होते. तर तिच्यासाठी काम करणाऱ्या मुलींमध्ये अनेक मॉडल्स आणि अभिनेत्रींचा समावेश होता. त्यांना कोलकाता, राजस्थान, मुंबई आणि पंजाबमध्ये पाठवलं जात होतं.

सोनूच्या लाइफमध्ये आलेले सगळे ठार

सोनू पंजाबनच्या लाइफमध्ये जी व्यक्ती आली ती नंतर मारली गेली. आधी सोनूचं अफेअर गॅंगस्टर विजयसोबत होतं. दोघांनी लग्न केलं होतं. पण २००३ मध्ये त्याला पोलिसांनी ठार केलं. त्यानंतर तिने दीपकसोबत लग्न केलं. त्याचाही एनकाउंटरमध्ये खात्मा झाला. नंतर तिने दीपकचा भाऊ हेमंतसोबत लग्न केलं. हेमंतने सोनूची सेक्स रॅकेटमध्ये फार मदत केली. नंतर हेमंतला सुद्धा पोलिसांनी ठार केलं.
 

Web Title: Sonu punjaban tried to committed suicide in jail, All you need to know about Sonu Punjaban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.