जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:50 IST2025-06-15T20:03:56+5:302025-06-16T16:50:55+5:30

जावई आणि सासऱ्यामध्ये वादानंतर झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली.

Son-in-law kills father-in-law, incident in Gadchiroli district, accused arrested | जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

दिगांबर जवादे 

गडचिरोली : जावई आणि सासऱ्यामध्ये वादानंतर झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली. आरोपी सासऱ्याला अहेरी पोलिसांनी अटक केली आहे. रमेश पोचम दुर्गे (५५) रा. महागाव असे मारहाणीत मृत्यू झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर चंद्रशेखर हिरालाल पवार (२५) रा. चितापूर तांडा, जिल्हा गुलबर्ग (कर्नाटक) असे आरोपी जावयाचे नाव आहे.

मयताची मुलगी आणि जावई कर्नाटकात राहायचे. ते मागील काही दिवसांपूर्वी महागाव येथे आले होते. १४ जून रोजी सासरे रमेश दुर्गे यांनी दारूच्या नशेत जावई चंद्रशेखर पवार यांच्यासोबत 'तुम्ही इथे कशाला आले?' असा सवाल करत वाद घातला. त्या दोघांमध्ये यावेळी कडाक्याचं भांडण झाले. रागाच्या भरात चंद्रशेखर पवार याने सासऱ्याला मारायला सुरुवात केली. चंद्रशेखरची पत्नी आपल्या वडील आणि पतीमध्ये सुरू असलेले भांडण सोडवायला गेली. मात्र जावयाने रागाच्या भरात लाथाबुक्क्याने सासऱ्याचा डोळ्यावर, छातीवर, पाठीवर, तोंडावर बेदम मारहाण केली. यात सासरा रस्त्याच्या कडेला पडला. त्यानंतर सुद्धा जावयाने मारहाण केल्याने सासऱ्याचा यात मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार हर्षल एकरे करीत आहेत. 

सासऱ्याचे पत्नीसोबत सतत वाद
सासरा रमेश दुर्गे याचे त्याच्या पत्नीसोबत नेहमीच वाद व्हायचे. यापूर्वी झालेल्या पती-पत्नीच्या वादात रमेशची पत्नी माया गंभीर जखमी झाली होती. त्यावेळी सासऱ्यावर पत्नीला मारहाण केल्याने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होता.

Web Title: Son-in-law kills father-in-law, incident in Gadchiroli district, accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.