भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 19:56 IST2025-12-07T19:53:04+5:302025-12-07T19:56:25+5:30
एका महिलेची आणि तिच्या शेजारी झोपलेल्या तिच्या ५ वर्षांच्या नातीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

फोटो - ndtv.in
राजस्थानच्या सलूंबर जिल्ह्यात झालेल्या डबल मर्डरने संपूर्ण परिसराला हादरवून टाकलं आहे. एका महिलेची आणि तिच्या शेजारी झोपलेल्या तिच्या ५ वर्षांच्या नातीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
या क्रूर घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्याने महिलेचे पाय कापले, तिचे चांदीचे कडे चोरले आणि घटनास्थळावरून पळून गेला. या घृणास्पद हत्येसाठी पीडितेच्या कुटुंबाने थेट महिलेच्या जावयालाच जबाबदार धरलं आहे.
गुन्हेगारांनी त्यांच्या क्रूरतेने वृद्ध महिला गौरीचे पाय कापले आणि तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. हत्येनंतर, गुन्हेगारांनी महिलेच्या पायातील चांदीचे कडे कापले आणि ते घेऊन गेले. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य गावात सत्संग कार्यक्रमात सहभागी झाले होते असं गावकऱ्यांनी सांगितलं.
या प्रकरणात कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या जावयावर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेश यादव यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सखोल तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात असं दिसून आलं की, घरातून चांदीच्या कड्यांशिवाय काहीही गायब झालेलं नाही. गुन्हेगारांनी दरोडा टाकला असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस जावयावरील आरोपांचीही अधिक चौकशी करत आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवागारात ठेवले आहेत आणि शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली आहे.