सतत पैशांच्या मागणीला जन्मदाती आई वैतागली; मुलाची हत्या करून कसारा घाटात टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 11:46 AM2021-01-12T11:46:58+5:302021-01-12T11:47:46+5:30

Crime News: जन्मदात्या आई सह दोन जणांना अटक; पोलिसांनी केला चार तासात गुन्हा उघड

son demanding for money daily; mother and brother killed him and thrown into Kasara Ghat | सतत पैशांच्या मागणीला जन्मदाती आई वैतागली; मुलाची हत्या करून कसारा घाटात टाकले

सतत पैशांच्या मागणीला जन्मदाती आई वैतागली; मुलाची हत्या करून कसारा घाटात टाकले

googlenewsNext

- शाम धुमाळ
कसारा : मुलगा सतत पैशाची मागणी करून घरात त्रास देत धमकावत असल्याने त्रासलेल्या जन्मदात्या आईने मोठया मुलाच्या व दूरच्या नातेवाईकाच्या  मदतीने आपल्या दोन नंबरच्या मुलाची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कसारा घाटात टाकला. या हत्येचा तपास कसारा पोलिसांनी अवघ्या 4 तासात केला.
    ठाणे येथील चिराग नगर येथे  शिवाजी रामदास आगळे (वय 25), सतीश रामदास आगळे (वय 24) हे दोन भाऊ आपली आई मायाबाई  रामदास आगळे हिच्या  सोबत राहत होतेय दोन भावापैकी शिवाजी हा एका डेअरीमध्ये काम करत होता. तर सतीश हा बेरोजगार होता तर आई घरकाम करते. 


आरोपी आईने दिलेल्या माहितीनुसार, बेरोजगार असलेला सतीश हा घरात दररोज दारू पिऊन शिव्या देत पैशाची मागणी करीत होता. पैसे नाही दिले तर तुम्हाला मारून टाकीन अशी दमदाटी करायचा. असाच प्रकार त्याने 6 जानेवारीला केला. त्याच वेळी आई मायाबाईने आपल्या मोठया मुलाच्या व नात्याने भाचा असलेल्या अमृत जंगा बिरारे (वय 24, रा. नंदुरबार) याच्या  मदतीने  दिनांक 7 रोजी पहाटे च्या सुमारास सतीषवर  धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्याचे हात पाय बांधून  त्याला दोन तीन प्लास्टिक मध्ये गुंडाळले. त्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून सकाळी 6 च्या दरम्यान कसारा घाटातील दरीत टाकून दिला.


दरम्यान दोन दिवसानंतर मयताची आई मायाबाई व शिवाजी आगळे यांनी एक बनाव रचला. 9 रोजी सकाळी मयत सतीषचे कपडे घेऊन पुन्हा कसारा घाटात आले. तिथे टेहाळणी करून ते कपडे घाटातील (त्याच स्पॉट वरील ) एका कठड्यावर ठेवले. तेथून काही अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीत गेले व तेथे कार्यरत असलेले महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांना भेटून  मला फोन आलेला. आमच्या मुलाचा घातपात झालाय त्याचे कपडे घाटात आहेत, असे सांगितले.  घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महामार्ग पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ कसारा पोलीस ठाण्यात कळवले व तपास सुरु झाला. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी पी भोये यांनी वरिष्ठांना माहिती देत  पोलीस उपनिरीक्षक भोस व कर्मचारीना  घेऊन घाटातील ठिकाणी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनीही  घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला असता पोलीस अधिकाऱ्यांना घाटातील दरीत 150 फुटावर एक संशयास्पद पोते दिसले. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने दरीतील पोते वर काढले असता त्यात सतीशचा मृतदेह आढळून आला. 


काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मयतची आई मायाबाई व भाऊ शिवाजी यांना सोबत घेत त्यांना कसारा पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संशय आल्याने त्यानीं कसारा पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मायाबाई आगळे व शिवाजी आगळे यांची स्वतंत्र उलट तपासणी केली असता अनेक सत्य समोर आले. त्यानंतर सदर मृतदेह शवविच्येदणासाठी जे जे हॉस्पिटलला रवाना केला. शहापूर न्यायालयाने 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Web Title: son demanding for money daily; mother and brother killed him and thrown into Kasara Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.