जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:09 PM2021-10-13T16:09:44+5:302021-10-13T16:12:31+5:30

Honey Trapping Case : सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते.

soldier caught in Pakistani woman's trap; Was sending secret information across the border | जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती

जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती

Next
ठळक मुद्देजोधपूर मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह यांनी सीमेपलीकडे बसलेल्या या महिलांना सैनिक क्षेत्राची गोपनीय माहिती पाठवायला सुरुवात केली.

जोधपूर - देशाची सुरक्षेचा भंग कारण्याबाबत संबंध पुन्हा सक्रिय झाले आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून महत्त्वाची माहिती मिळवण्याचे काम पाकिस्तानी एजन्सी ISI च्या महिला करत आहेत. पुन्हा एकदा असेच एक प्रकरण समोर आले आहे. जोधपूरमध्ये या संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. येथील सोशल मीडियावर पाकिस्तानी सुंदर महिलांच्या संपर्कात आल्यानंतर कळले आहे. जोधपूर मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह यांनी सीमेपलीकडे बसलेल्या या महिलांना सैनिक क्षेत्राची गोपनीय माहिती पाठवायला सुरुवात केली.


गेल्या ३ महिन्यात पाठवलेली बरीच महत्वाची माहिती
लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते. तो सोशल नेटवर्किंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIला सीमेपलीकडे आपल्या देशाची गोपनीय आणि धोरणात्मक माहिती पाठवत होता. असे सांगितले जात आहे की, गेल्या ३ महिन्यांत त्याने अनेक महत्वाची माहिती पाठवली आहे. यासाठी त्याला अटक करण्यात आली होती आणि जोधपूरमध्ये गेल्या ३ दिवसांपासून त्याची चौकशी केली जात होती. मंगळवारी गुप्तचर यंत्रणा त्याला जयपूरला घेऊन गेली. आता जयपूरमधील गुप्तचर संस्थांकडून संयुक्त चौकशी केली जाईल. प्राथमिक चौकशी आणि तपासात त्याच्या फोनवरून अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्याचे समोर आले आहे.

लष्करी अभियांत्रिकी सेवेत तीन वर्षांसाठी नियुक्ती
सिरोही जिल्ह्यातील माउंट आबू भागात असलेल्या गोवा गावातील रहिवासी राम सिंह यांची ३ वर्षांपूर्वी लष्करी अभियांत्रिकी सेवेत नियुक्ती झाली होती. तपासादरम्यान, त्याच्या फोनवरून लष्कराच्या अनेक पत्रांची छायाचित्रे सापडली जी त्याने सीमे पलीकडे पाठवली. जर सुत्रांवर विश्वास ठेवला गेला तर गुप्तचर संस्थांकडून या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. यामध्ये अनेक नवीन खुलासे होणार आहेत. सध्या तपास सुरू आहे.


 

Web Title: soldier caught in Pakistani woman's trap; Was sending secret information across the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.